Police Recruitment : पोलिस भरतीची वेबसाईट हँग, उमेदवारांना सायबर कॅफेतच रात्र काढण्याची वेळ!

Police Recruitment : अर्ज भरण्यासाठी तारीख वाढवण्याची मागणी होत आहे.
Police Recruitment
Police RecruitmentSarkarnama

Police Recruitment : नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस भरती प्रक्रीयेसाठी शासनाच्या वेबसाईट अर्ज भरायचा आहे, ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याचे समोर आले आहे. या साईटवर उमेदवारांना अर्ज भरताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे़. पुढच्या काही दिवसात राज्यात जवळपास 20 हजार पोलिस भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. मात्र उमेदवारांना आता मनस्ताप सहन करावे लागत आहे.

Police Recruitment
Shahajibapu Patil : आसामच्या मुख्यमंत्र्यांसमोर बापू इंग्लिशमधून म्हणाले, 'काय झाडी, काय डोंगार..

पोलिस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार सेंटरकडे जात आहेत. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवार हतबल झाले आहेत. सातत्याने शासनाची साईट स्लो चालत असल्याने, उमेदवारांची अडचण होत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांना सायबर कॅफेतच रात्र जागून काढावी लागत आहे. यामुळे आता पोलिस भरती अर्ज करण्याची मुदत तारीख वाढवून द्या, अशी मागणी होत आहे.

Police Recruitment
मंगलप्रभात लोढा, नार्वेकरांना कोर्टाने फटकारले : गुजरात निवडणूक अधिकृत काम आहे का?

बीड मधील काही पोलिस भरती इच्छुक उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. "मी पहिल्यांदाच पोलिस भरतीसाठी अर्ज करत आहे. मात्र मला अर्ज भरता येत नसेल तर मी काय करावं? आणखी एका उमेदवाराने म्हंटले की, तीन दिवसांपासून अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करतोय मात्र, अजूनही प्रक्रीया पूर्ण झाली नाही. रात्री बारा बाजेपर्यंत अर्ज भरतोय, पण भरला जात नाही. यामुळे आता अर्ज भरण्यासाठी तारीख वाढवण्याची मागणी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in