OBC Reservation PCMC : पिंपरीत ३७ ओबीसी नगरसेवक दिसणार ; काही दिग्गजांचा पत्ता कट

मातब्बरांना आपली आई,पत्नी,भावजय,बहिण यांना उमेदवारी घेऊन नगरसेवक घरातच ठेवावे लागणार आहे किंवा शेजारच्या प्रभागात घुसखोरी करावी लागेल.
PCMC Latest News
PCMC Latest NewsSarkarnama

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थात पुन्हा राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri Municipal Corporation) महापालिकेला ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) सोडत आज (शुक्रवारी) पुन्हा काढावी लागली. त्यामुळे आता या पालिकेत पुन्हा हक्काचे ३७ इतर मागासवर्गाचे तथा ओबीसी नगरसेवक दिसणार आहेत. दरम्यान,ओबीसी आरक्षणामुळे दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. खुल्या गटातून व त्यातही पुरुष इच्छूकांतील चुरस आणखी वाढली आहे. (OBC Reservation PCMC news update)

ओबीसीच्या ३७ (त्यात १८ महिला)आणि ओपन महिलांच्या ३८ जागांसाठी आज ही सोडत काढली गेली. त्यात शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे व मनसेचे शहराध्यक्ष व पिंपरी पालिकेतील एकमेव नगरसेवक सचिन चिखले यांच्या जागेवर महिला आरक्षण पडल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. एकतर, अशा मातब्बरांना आपली आई,पत्नी,भावजय,बहिण यांना उमेदवारी घेऊन नगरसेवक घरातच ठेवावे लागणार आहे किंवा शेजारच्या प्रभागात घुसखोरी करावी लागेल.

PCMC Latest News
OBC Reservation : पुणे महापालिका ओबीसी आरक्षणात दिग्गजांना दणका

पिंपरी पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसीविना आरक्षण सोडत दोन महिन्यापूर्वी (३१ मे) काढली गेली होती. त्यातून अनेक विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट झाला होता. तर, गाववाल्यांची मोठी कोंडी होऊन ते एकमेकांसमोर उभे ठाकले गेले होते. आता, तर ३७ जागा ओबीसी राखीव झाल्याने तेवढ्या ओपनच्या जागा कमी होणार आहे. दुसरीकडे या गटात इच्छूकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे त्यांच्यात व त्यातही पुरुषांत उमेदवारीसाठी गळेकापू स्पर्धा पहायला मिळणार आहे.

पिंपरी पालिकेत २०१७ ला १२८ जागा, तर चार सदस्यांचे ३२ प्रभाग होते. २०२२ ला ही संख्या अनुक्रमे १३९ आणि ४६ झाली आहे. १३९ पैकी ७० जागा महिलांसाठी राखीव आहेत. २२ जागा एससी (त्यात ११ महिला) आणि तीन एसटी (त्यात दोन महिला) आहेत. एससी,एसटीसह ओपन महिलांच्या जागा (५७)गत आरक्षणात निश्चीत करण्यात आल्या होत्या. दरम्यान, न्यायालयाच्या ओबीसींचे राजकीय आरक्षण बहाल करण्याच्या ताज्या निकालामुळे एससी व एसटी आरक्षणाची गत सोडत काय ठेवून ओबीसी, ओबीसी महिला व ओपन तथा सर्वसाधारण महिला गटासाठी आज पुन्हा शाळकरी मुला-मुलींच्याच हस्ते सोडत सोडण्यात आली.

अशी आहे पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत!

प्रभाग क्रमांक 1 – तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 2 – चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी (एससी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 3 – बो-हाडेवाडी, जाधववाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 4 – मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 5 – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 6 – दिघी, गणेशनगर, बोपखेल( एसटी पुरुष,सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 7 – सँण्डविक कॉलनी, रामनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 8 – भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 9 – धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 10 – इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 11 – गवळीमाथा, बालाजीनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 12 – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 13 – मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 14 – यमुनानगर, फुलेनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 15 – संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 16 – नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर ( एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 17 – वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर( एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 18 – मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 19 – चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 20 – काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 21 – आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 22 – ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 23 – वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहत (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत (एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 26 – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 27 – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह ( ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 28 – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 29 – भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल (एससी, सर्वसाधारण महिला,

सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 30 – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 31 – काळेवाडी, विजयनगर, नढेनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 32 – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर ( एससी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर ( ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी ( एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 36 – गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल ( ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडक ( एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 39 – पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 40 – पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती (एससी महिला, एसटी महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 42 – कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 43 – दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर ( एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क (एससी, एसटी महिला, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 45 – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 46 – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in