Gram Panchayat Election: झेडपी, पंचायत समितीसाठी कऱ्हाड दक्षिणेत सावधानतेची गरज; उत्तरमध्ये नो प्रॉब्लेम

Gram Panchayat Results : ग्रामपंचायत निकालातून कऱ्हाडच्या नेत्यांना मतदारांचा इशारा
Karad News
Karad News Sarkarnama

कऱ्हाड : (जि.सातारा) तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची लिटमस टेस्टच पार पडली आहे. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांची निर्विवाद सत्ता कायम राहिली आहे. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटाची बेरीज केली तर त्यांना चांगले यश मिळाल्याचे दिसत आहे.

भाजपचे (BJP) चिटणीस अतुल भोसले यांनाही दक्षिणेत यश मिळाले आहे. मात्र त्यांच्या हक्काची रेठरे खुर्द आणि भाजपचे तालुकाध्यक्षांच्या गावातील त्यांची सत्ता गेल्याचे शल्य त्यांना आहे. त्यामुळे दक्षिणेतील कोणत्याही नेत्यांना उत्तरसारखे स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत नाही. परिणामी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणमधील नेत्यांनी मतदारांना गृहीत धरु नये, असाच सावधानतेचा इशारा ग्रामंपाचयीतींच्या निकालातून दिला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी उमेदवारी अर्ज माघारीनंतर सात ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध झाल्या. चार ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. त्यामुळे ३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये सरपंचपदासाठीच्या २९ जागांसाठी ९० उमेदवारांनी तर २६७ सदस्यपदांसाठी ६८५ उमेदवारांनी मतदारांचा कौल आजमावला.

Karad News
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी तो आदेश मागे तर घेतला, पण आता अधिकारी अडकणार?

निवडणुकीत पुरुषांचे ३३ हजार ८३३ आणि महिलांचे ३२ हजार ८४ असे ६५ हजार ९६७ मतदार होते. त्यापैकी २८ हजार ६६३ पुरुषांनी तर २६ हजार १८३ महिला असे मिळून ५४ हजार ८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचा निकाल कालच जाहीर झाला. त्यामध्ये गावच्या सत्तेचा फैसला झाला.

कऱ्हाड दक्षिणमध्ये येळगाव, कासारशिरंबे, मनव, तारूख, ओंडोशी आदी गावात आमदार चव्हाण आणि उंडाळकर यांच्या गटाच्या रुपाने काँग्रेसची (Congress) सत्ता कायम राहिली आहे. तर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जुळेवाडी, दुशेरे येथील सत्ता कायम ठेवली. वडगाव हवेली ग्रामपंचायतीत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणून तेथे सत्तांतर घडवत भोसले गटाचे आणि कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप गट सत्तेत आला.

Karad News
Grampanchayat Election : पराभव जिव्हारी, समर्थकांकडून मिरवणूकीवर दगडफेक; १३ जणांवर गुन्हा

आणे ग्रामपंचायतीत भोसले गटाने सरपंचपदासह सहा जागा मिळवत सत्तांतर घडवले. आटके ग्रामपंचायतीत पस्तीस वर्षानंतर सत्तांतर झाल्याने तेथे भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांच्या गटाचा दारूण पराभव झाला. आणि रेठरे खुर्द या भोसलेंच्या होम पिचवरील ग्रामपंचायतीत त्यांच्या गटाच्या पॅनेलचा पराभव झाला. याचे शल्य भोसले गटाला राहणार आहे.

कऱ्हाड दक्षिणमधील कोरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार पाटील व भाजपचे भोसले यांच्या गटाचा करिष्मा दिसून आला आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीकाँग्रेसने सत्ता कायम राखली आहे. चरेगाव, पाडळी-हेळगाव, किवळ, अंतवडी, हनुमानवाडी, कालगाव यासह अन्य ग्रामपंचायतीतील सत्ता कायम राहिली आहे. त्यामुळे कऱ्हाड उत्तरमध्ये आमदार पाटील यांची निर्विवाद सत्ता कायम राहिली आहे.

मात्र कऱ्हाड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे चिटणीस अतुल भोसले यांच्या गटाला स्पष्ट कौल मतदारांना दिलेला नाही. त्याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दिसून येणार आहे. यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीतून मतदारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांना गृहीत धरु नये,यासाठी सावधानतेचा इशाराच दिला आहे. यामुळे नेत्यांनीही आता सावध पावले उचलण्याची गरज आहे.

Karad News
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; या भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण

उत्तरमध्ये तीन ठिकाणी काँग्रेसला हात

कऱ्हाड उत्तरमधील कवठे, तळबीड, हिंगनोळे ग्रामपंचायतीत काँग्रेसला मतदारांना हात दिला आहे. कवठे ग्रामपंचायतीत २० वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. तळबीडमध्ये सत्तांतर होऊन तेथे उमेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आली. हिंगनोळे ग्रामपंचायतीतील काँग्रेसची सत्ताही कायम राहिली आहे.

काही गावात उंडाळकर-भोसले गट अजूनही एकत्र

कऱ्हाड दक्षिणध्ये गेली अनेक वर्षे उंडाळकर-भोसले गट एकत्र होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहिल्याने उंडाळकरांनी काँग्रेस सोडली नाही तर भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्या दोन गटातील अंतर वाढले आहे.

मात्र अजूनही काही गावात काँग्रेसचे अॅड.उंडाळकर आणि भाजपचे भोसले गटाचे सख्य कायम असल्याचे निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. त्यामध्ये कुसूर, वनवासमाची-खोडशी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्या दोन ग्रामपंचायतीत उंडाळकर-भोसले गटाची सत्ता आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com