सोनई ( जि. अहमदनगर ) - सोनई ( ता. नेवासे ) येथील दोन युवकास कुठलाही गुन्हा नसताना कुणाच्या तरी सांगण्यावरून बेड्या ठोकून बेदम मारहाण केल्याप्रकरणी सोनईचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुलसह फौजदार, सहायक फौजदार व अन्य एक जणाला निलंबित करण्यात आले आहे. ( Youth beaten up: Four persons suspended including assistant police inspector )
गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते व सोनई येथील तुषार देव्हारे या दोन युवकास 15 एप्रिल 2022 रोजी कुठलाही गुन्हा नसताना घरुन बेड्या घालून पोलीस ठाण्यात आणले होते. येथे दोघास बेदम मारहाण करण्यात आली होती. 17 एप्रिल रोजी अजय मोहिते यांनी पोलिसांच्या विरोधात तक्रार दिली होती. 23 एप्रिल 2022 रोजी सातशेहून अधिक युवकांनी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.याप्रकरणाची अॅडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने बेशीस्त व हालगर्जीपणाचे वर्तन तसेच पुढील चौकशीत हस्तक्षेप व साक्षीदारावर दबाव टाकू नये याकरीता सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, फौजदार उमेश पतंगे,सहायक फौजदार संजय चव्हाण व अनिल जाधव या चौघांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.