Indian Army Agniveer : धक्कादायक! भावी अग्निवीर 'स्टेरॉईड'च्या विळख्यात

भरतीसाठी गेलेले तरुण सर्रास स्टेरॉईड घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Agniveer Recruitment| Kolhapur
Agniveer Recruitment| Kolhapur

Kolhapur Agniveer Recruitment : कोल्हापूरमधून एक धक्कादायक महिती समोर आली आहे. अग्निवीर सैन्य भरतीसाठी गेलेल्या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात स्टेरॉईडचा वापर सुरु असल्याची माहिती आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया राबवतानअचानक एक तरुण बेशुद्ध पडल्याने हा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात अग्निवीर भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती. यावेळी अचानक एक तरुण बेशुद्ध पडल्याने हा प्रकार समोर आला आहे. सैन्य भरती प्रक्रियेत तात्पुरत्या ऊर्जेसाठी तरुण सर्रास स्टेरॉइडचा वापर करत आहेत. धक्कादायक म्हणजे, तरुणांच्या स्वच्छतागृहात तर स्टेरॉइडच्या इंजेक्शनचा अक्षरश: खच पडल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेदरम्यान होणारा स्टेरॉइडचा वापर आणि बाजार उघडकीस आला आहे.

भरती प्रक्रिया राबवताना धावण्याच्या चाचणीत तरुणांमध्ये मोठी स्पर्धा असते. या स्पर्धेत धावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तरुण सर्रास स्टेरॉइड इंजेक्शनचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. तरुण भरती प्रक्रिया सुरू होण्याआधी काही मिनिटे हे इंजेक्शन घेतात त्यामुळे तरुणांमध्ये तात्पुरती ऊर्जा वाढते. परिणामी स्पर्धेत त्यांची धावण्याची गती वाढते. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हातकणंगले तालुक्यात काही तरुण भरती प्रक्रियेसाठी आले होते. सकाळी चाचणीसाठी तयार होण्यासाठी मध्यरात्रीनंतर एका तरुणाने स्टेरॉईडचे इंजेक्शन घेतले. पण ते घेतल्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. चाचणीवेळी तरुण बेशुद्ध पडल्याने त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले.

पाच हजारांना एक इंजेक्शन?

धक्कादायक बाब म्हणजे. भरतीसाठी येतानाच अनेक उमेदवार स्वत:सोबत स्टेरॉइडचे इंजेक्शन घेऊन येतात. कोल्हापुरच्या सायबर चौकात स्टेरॉइडच्या इंजेक्शनची विक्री करणारे एक रॅकेटही त्यामुळे सक्रिय असल्याचीही माहिती मिळाली आहे. इथे एका इंजेक्शनची पाच हजार रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या तरुणांचे अज्ञान आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन तरुणांना लुटले जात आहे.

सैन्य भरती, पोलिस भरती आणि खेळांमध्ये स्टेरॉइडच्या वापरास परवानगी नाही. स्टेरॉइडने तात्पुरती ऊर्जा आणि उत्साह वाढतो, पण त्याचे शरीरावर दिर्घकालीन गंभीर परिणाम होतात. कडेकोट बंदोबस्त असतानाही भरती प्रक्रियेत तरुणांकडे स्टेरॉइडचे इंजेक्शन मिळणे हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावरच त्यांच्या बॅगची तपासणी का होत नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्टेरॉईड हे एक मानव निर्मित औषध आहे, जे कोर्टिसोलपासून मिळतं. स्टेरॉईड सारखी औषधं शरीरात हार्मोन्स तयार करण्याचे काम करतात. हे शरीराच्या अवयवांची सूज तसेच संबंधीत दुखण्याला कमी करण्याचं काम करतं. पण स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, यकृताचे नुकसान होणे, अंडकोष आकुंचन पावणे असे गंभीर आजार होऊ शकतात. स्टिरॉइड्स घेणे बंद केल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम अनेक वर्षे टिकू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in