नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

हिंदू मित्राला मुस्लीम मित्रांकडून जमावासह मारहाण करण्यात आली.
Nupur Sharma
Nupur SharmaSarkarnama

सोलापूर : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने सोलापुरात (Solapur) तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. शर्मा यांच्या समर्थनार्थ स्टेट्‌स ठेवणाऱ्या हिंदू मित्राला मुस्लीम मित्रांकडून जमावासह मारहाण करण्यात आली. जबर मार लागल्याने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. (Young man beaten for holding status in support of Nupur Sharma)

नरेंद्र श्रीराम असे मारहाण झालेल्या पीडित तरुणाचे नाव आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना सोलापुरातील शांती नगर परिसरात घडली आहे. नरेंद्र श्रीराम याने नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवले होते. स्टेटस ठेवल्यानंतर आरोपी तरुणाकडून स्टेटस ठेवून संबंधित तरुणाचा पत्ता सांगण्याचे आवाहन केले होते. स्टेटस ठेवल्यानंतर माफी मागूनही मुस्लिम तरुणांकडून मारहाण करण्यात आली आहे.

Nupur Sharma
अपक्षांवर आरोप करणाऱ्या राऊतांना शिवसेनेतील खदखद दिसेल का?

हिंदू मित्राला मुस्लिम मित्राकडून जमावासह मारहाण करण्यात आली आहे. मारहाण पीडित तरुण नरेंद्र श्रीराम याला मारहाणीत लाथा-बुक्क्या तसेच फायटर हत्याराने जबरी मारहाण केली आहे. स्टेटस ठेवल्यानंतर आरोपी तरुणांकडून स्टेटस ठेवून संबंधित तरुणाचा पत्ता सांगण्याचे आवाहन केले होते. स्टेटस ठेवल्यानंतर नरेंद्र याने माफी मागितली होती. त्यानंरतही मुस्लिम तरुणांकडून नरेंद्र श्रीराम याला मारहाण करण्यात आली आहे.

Nupur Sharma
भगिरथ भालकेंच्या अडचणीत वाढ : विठ्ठल परिवारात २० वर्षांनंतर फूट!

मारहाणीत पीडित तरुण नरेंद्र श्रीराम याला जबरी मारहाण झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण केल्याप्रकरणी वसीम पठाण, निसार सय्यद, अल्ताफ शेख, नोहिद यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.

Nupur Sharma
राष्ट्रवादीच्या आमदारांना अजितदादांच्या कार्यालयातून फोन; ‘शनिवारी मुंबईत पोचा’

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणारं वक्तव्य केले होते. त्यानंतर जगभरातील इस्लामिक राष्ट्रांनी त्याचा विरोध दर्शवला आहे. त्यानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतामध्ये आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, शर्मा यांच्या वक्तव्यानंतर त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या धोरणांच्याविरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत नुपूर शर्मा यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. तसेच, मुंबई, ठाणे पोलीस ठाण्यासह पुणे व हैदराबाद शहरांमध्येही नूपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com