Solapur Congress News : तुम्ही जबाबदारी घ्या; सुशीलकुमार शिंदे लोकसभेला उभे राहतील : पटोलेंचा काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश

तुम्हाला जबाबदारीच घ्यायची नसेल तर वारंवार या चांगल्या माणसाचा मी अपमान होऊ देणार नाही.
Nana Patole- Sushilkumar Shinde
Nana Patole- Sushilkumar ShindeSarkarnama

सोलापूर : ‘‘तुमची इच्छा असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे उभे राहतीलही. पण, या निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले पाहिजेत, ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला जबाबदारीच घ्यायची नसेल तर वारंवार या चांगल्या माणसाचा मी अपमान होऊ देणार नाही,’’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. (You take responsibility; Sushilkumar Shinde will stand for Lok Sabha : Nana Patole)

काँग्रेस (Congress) पक्षाच्या महानिर्धार मेळावा सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात झाला. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान, सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, अस्लम शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

Nana Patole- Sushilkumar Shinde
Anil Deshmukh News : तुरुंगाबाहेर आलेल्या अनिल देशमुखांनी पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली : नरखेड ‘खरेदी विक्री’वर राष्ट्रवादीचा झेंडा

नाना पटोले म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे हे खासदार असले पाहिजेत, असं तुम्ही म्हणतात. पण, ते निवडणूक लढायला तयार नाहीत, असं मला त्यांनी कानात सांगितले. तुमची इच्छा असेल तर ते निवडणुकीला उभे राहतीलही. पण या निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले पाहिजेत, ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला जबाबदारीच घ्यायची नसेल तर वारंवार या चांगल्या माणसाचा मी अपमान होऊ देणार नाही.

Nana Patole- Sushilkumar Shinde
Radhakrishna Vikhe Patil News : आमच्याच तहसीलदारांची आम्हाला लाज वाटते : महसूलमंत्री विखे पाटलांनी व्यक्त केली खंत

तुम्ही जबाबदारी घेणार का, असा सवाल पटोले यांनी करताच उपस्थितींमधून जबाबदारी घेणार असा प्रतिसाद मिळाला. मला सोलापूर लोकसभेची जागा, तर जिंकायचीच आहे. पण त्याबरोबरच माढ्याची जागाही जिंकायची आहे. कारण, मला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे मला तुमची हमी हवी आहे. मी सुशीलकुमार शिंदे उभा असे समजून काम केले पाहिजे.

Nana Patole- Sushilkumar Shinde
Maharashtra Politic's : भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार अन्‌ अपराधी आहेत : शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्री करण्याची मागणी झाली. पण त्यांना आता मंत्री कसं करता येईल. त्यासाठी राज्यात आपली सत्ता आली पाहिजे आणि सत्ता आणण्यासाठी आमदार बहुसंख्येने निवडून आले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्वच सर्व अकरा आमदार निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असे सक्त ताकीद पटोले यांनी दिली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com