'कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत'

Raj Thackeray| Jayant Patil| NCP | राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलेली
'कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत'
Devendra Fadanvis| Raj Thackeray

सांगली : राज ठाकरे यांच्या भाषणात मला काहीच दम वाटला नाही. पण शरद पवारांचा (Sharad Pawar) द्वेष, त्यांच्याविरोधात बोलणे, अशी स्क्रिप्ट कुणीतरी राज ठाकरे यांना कुणीतरी दिली आहे. ती स्क्रिप्ट वाचण्याचा दबाव राज ठाकरेंवर (Raj Thackeray) दिसत आहे आणि त्यामुळे ते नाईलाजास्तव शरद पवारांवर टीका करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुंबईत देवेंद्र फडणवीसांचे भाषण संपले आणि तिकडे औरंगाबादमध्ये राज ठाकरे भाषण सुरु झाले. फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाचे पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक केला. यातून दोघांचीही मिलीभगत असल्याचेच सिद्ध होत आहे. अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. खासकरुन शरद पवार यांच्यावर टीका केली की मिडीया कव्हरेज मिळतेच. त्यामुळे राज ठाकरे सतत शरद पवारांवर बोलले.

राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसत आहे. त्यामुळे भाषणावेळी राज ठाकरे यांची फारच केविलवाणी अवस्था झाली होती. देशातल्या वाढत्या महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या. पण राज ठाकरेंनी देशतल्या महागाईच्या मुद्द्यावरही बोललं पाहिजे पण ते महागाईवर बोलत नाहीत, कारण राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलेली आहे, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लागावला आहे.

शरद पवार यांच्याविरोधात बोलून राज्यात जातीयवादी विष कालवून जाती धर्मात तेढ निर्माण करुन कसे समाजात विष कालवता येईल आणि त्यासाठी जितके जास्त चिथावणीखोर बोलता येईल यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत होते. पण महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिम हुशार आहेत मतांच्या राजकारणासाठी हे सर्व सुरु आहे हे त्यांनाही माहिती झालं आहे. त्यांना हिंदू-मुस्लिमांच्या विकासाचे देणेघेणे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे भाजप विरोधात एक शब्दही बोलत नाहीत, दिवसेंदिवस वाढत्या महागाईवरही राज ठाकरे यांनी बोलायला हवं पण ते भाजप विरोधात का बोलत नाहीत, याचं राज ठाकरे उत्तर देऊ शकत नाहीत. कारण राज ठाकरेंवर ईडीचा किंवा अन्य कोणाचा दबाव असल्याने ते फक्त शरद पवारांच्या विरोधातच बोलत असतात. असे जयंत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.