नेवाशात महिला अ‍ॅक्शन मोडवर : उमेदवारीसाठी गडाखांकडे भाऊगर्दी

सोशल मीडियावर उमेदवारांची चर्चा सुरु झाल्याने महिला अ‍ॅक्शन मोडवर आल्या आहेत.
Ahmednagar ZP
Ahmednagar ZPSarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर ) - नेवासे तालुक्यात अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आठ पैकी सात गटात महिलांचे आरक्षण पडल्याने गुढघ्याला बाशिंग बांधून तयारीत असलेल्या पतीवर पत्नीच्या उमेदवारीसाठी येरझरा घालण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर उमेदवारांची चर्चा सुरु झाल्याने महिला अ‍ॅक्शन मोडवर आल्या आहेत. ( Women on action mode in Newasa: Brotherhood to Gadakh for candidacy )

भेंडे, सलाबतपूर व शनिशिंगणापूर गट सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने येथे माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांची पत्नी उषा गडाख, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख, वैशाली शिवाजी शिंदे, सविता नानासाहेब नवथर, मिनल चांगदेव मोटे, उषा भाऊसाहेब मोटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. बेलपिंपळगाव-अनुसूचित जमाती,सोनई व भानसहिवरे इतर मागास प्रवर्ग तर चांदे- अनुसूचित जातीसाठी आहे.

Ahmednagar ZP
जन्मदात्या मातेनेच चिमुरड्याचे डोके ठेचून खून केल्याचे उघड, नेवासे तालुक्यातील घटना

पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार आपल्या पत्नीसाठी तर माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे यांनी नात माया शेंडे, माजी पंचायत समिती सदस्या चंद्रकला बापुसाहेब बारगळ आदींनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख गटाने मागील निवडणुकीत सात पैकी पाच जागा जिंकल्या असल्याने व सध्या त्यांचीच चलती असल्याने उमेदवारीसाठी गडाख गटाकडे भाऊगर्दी सुरू झाली आहे.

Ahmednagar ZP
शिवसेनेच्या सुनीता गडाख गर्जल्या : नेवाशात नारीशक्तीचा करिष्मा दाखवू

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनीही गट आणि गणानुसार चाचपणी करण्यास सुरुवात केल्याचे समजते.महिलांची उमेदवारी त्यांच्या पतीचा जनसंपर्क,केलेले काम, गट-गणात असलेली प्रतिमा व खिसा पाहूनच होईल असे दिसते. संभाव्य उमेदवारीवरून गप्पांचे फड रंगू लागले असुन उमेदवारांचे डेपोटेशन सुरु झाले आहे. पाचेगाव गट वगळता अन्य सात गटात महिलांची लढत आणि पुरुषांची लुडबुड चांगलीच रंगणार असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com