कायदे रद्द झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगला पैसा मिळेल...

मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai म्हणाले, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे Agriculture Laws केले होते. त्यावर सर्वच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून या कायद्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे केले होते.
कायदे रद्द झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगला पैसा मिळेल...
Shambhuraj Desai, Narendra Modisarkarnama

सातारा : कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तब्बल सव्वा वर्षे ऐतिहासिक आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत पंतप्रधानांनी आज शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय घेत तीनही कायदे मागे घेतले आहेत. मुळात केंद्र सरकारच्या हट्टवादी भूमिकेमुळे वर्षेभर शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले. आता या कायद्याची अडकाठी नसल्याने बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात चांगला पैसा पडणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले होते. त्यावर सर्वच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून या कायद्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे केले होते. हे देशातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन होते. शेतकऱ्यांना हे कायदे बिलकूल मान्य नव्हते. त्यामुळेच एवढे मोठे आंदोलन उभे राहिले होते.

Shambhuraj Desai, Narendra Modi
अन्नदात्यांना देशद्रोही, खलिस्तानी म्हटल्याबद्दल मोदींनी माफी मागावी...

या आंदोलनाला ज्या ज्या पक्षांनी पाठींबा दिला होता. त्या सर्वांनीच केंद्राकडे आग्रह धरून हे शेतकरी विरोधी कायदे असून ते मागे घेण्याची मागणी व विनंतीही केली होती. पण, गेली वर्षे, सव्वा वर्षे हट्टवादी भूमिका केंद्र सरकारने ठेवली होती. परंतू पंतप्रधानांनी आज शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय घेत हे तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत.

Shambhuraj Desai, Narendra Modi
शरद पवार म्हणतात आमचं ठरलंय! आता भाजपने दिवस मोजावेत

हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूचा असून शेतकऱ्यांच्या वर्ष सव्वा वर्षाच्या लढ्याला यश आले आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला माल मुठभर भांडवलदारांच्या हातात जाणार होता. पण, आता शेतकऱ्यांना त्यांचा माल हवा त्या भावाने हवा तिथे विकता येणार आहे. या कायद्याची अडकाठी नसल्याने बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात चांगला पैसा पडणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in