शिंदे, थोरातांच्या आशीर्वादामुळे सिद्धाराम म्हेत्रेंचे काँग्रेसमधील वजन वाढले

सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करून ‘म्हेत्रे अजूनही बलाढ्य’ असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोधकांना दाखवून दिले.
Balasaheb Thorat, Sushilkumar shinde- Siddaram Mhetre
Balasaheb Thorat, Sushilkumar shinde- Siddaram MhetreSarkarnama

अक्कलकोट : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddaram Mhetre) यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेली प्रचंड गर्दी व त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही देणारे दिग्गज नेतेमंडळी यामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करून ‘म्हेत्रे अजूनही बलाढ्य’ असल्याचे काँग्रेस (congress) कार्यकर्त्यांनी विरोधकांना दाखवून दिले. निमित्त जरी वाढदिवसाचे असले तरी आगामी निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच हे शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (With the blessings of Shinde and Thorat, Siddaram Mhetre gained weight in Congress)

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आठ एप्रिल रोजी अक्कलकोटला कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला. या मेळाव्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ, काँग्रेसमधील वजनदार नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यातील अनेक आमदार, माजी आमदार, माजी मंत्री उपस्थित होते. तसेच, सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील दोन आमदार उपस्थित होते.

Balasaheb Thorat, Sushilkumar shinde- Siddaram Mhetre
पवारांच्या बालेकिल्ल्यातून राजू शेट्टींचा पुन्हा एल्गार...!

अनेक सामाजिक उपक्रमांसोबत कार्यकर्ता मेळाव्याला झालेली गर्दी पाहता याचा विरोधकांनी धसका घेतल्याची चर्चा आहे. कारण, मागील विधानसभा निवडणुकीत सुमारे ३८ हजारांच्या मताधिक्क्याने भाजप उमेदवार सचिन कल्याणशेट्टी विजयी झाले होते. या मताधिक्यवरून आजी-माजी आमदारांमध्ये बरीच खडाजंगी झालेली होती. तसेच, अक्कलकोट तालुक्यातील अनेक विकास कामांच्या श्रेयावरून आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूल मंत्री थोरात यांनी म्हेत्रे यांना आशीर्वाद देत त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच राष्ट्रवादीची बलाढ्य तोफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनी तर म्हेत्रेंना खंबीर पाठिंबा व्यक्त करीत आगामी निवडणुकीत विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. तसेच, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्ष म्हेत्रेंच्या पाठीशी असल्याचे सांगितल्याने पक्षातील म्हेत्रेंचे वजन वाढले आहे.

Balasaheb Thorat, Sushilkumar shinde- Siddaram Mhetre
मॉन्सूनचा सांगावा...तयारीला लागा! : यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस

माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे गंभीर आजारातून तीनदा बचावले आहेत. तसेच त्यांच्या घरात गेल्या काही महिन्यांमध्ये दुःखद घटना घडल्या. तरीही सिद्धाराम म्हेत्रे न खचता लोकांच्या सेवेसाठी बाहेर पडले. याचा सर्व मान्यवरांनी आवर्जुन उल्लेख करीत तालुक्याच्या विकासाचा ध्येय बाळगणारा हा व्यक्ती विधानसभेत हवा, अशी भावना व्यक्त केली.

Balasaheb Thorat, Sushilkumar shinde- Siddaram Mhetre
केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार करण्याचा शब्द देणाऱ्या सोनवणेंना अजितदादा कोणते बक्षीस देणार?

म्हेत्रे निवडणुकीसाठी सज्ज

वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल मान्यवरांनी फुंकला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आगामी काळात शिंदे, थोरात व भुजबळ यांनी म्हेत्रेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिल्याने भाजपच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेली अनेक संकटे व पराभव यातून सिद्धाराम म्हेत्रे पूर्णपणे सावरल्याचे दिसत होते. त्यामुळे दांडगा अनुभव व थेट जनतेशी संपर्क असलेले म्हेत्रे आता पुन्हा निवडणुकीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com