अजितदादांच्या आशीर्वादाने नाहाटांना सभापतीपद : शिवसेनेचाही चंचू प्रवेश

महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघातील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड आज झाली.
Balasaheb Nahata, Santosh Suryawanshi
Balasaheb Nahata, Santosh SuryawanshiSarkarnama

पुणे - महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघातील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड आज झाली. या निवड प्रक्रियेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांचा शब्द चालला. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातल्या बाळासाहेब नाहाटा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेले सभापतीपद दिले आहे. त्यामुळे श्रीगोंदे तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. ( With the blessings of Ajit Pawar, Nahatana became the Speaker: Shiv Sena also entered )

सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब नाहाटा (श्रीगोंदे, जि. अहमदनगर) तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संतोष सोमवंशी (जि. लातूर) यांची बिनविरोध निवड झाली. 2022 ते 2027 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. बाजार समिती संघाच्या माध्यमातून शिवसेनेने सहकार क्षेत्रातील चंचू प्रवेश महत्वपूर्ण मानल जात आहे.

Balasaheb Nahata, Santosh Suryawanshi
पगारही होत नव्हते, ती बाजार समिती नफ्यात आणली!

राज्यातील 301 बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या सहकारी संघाची निवड प्रक्रिया आज (मंगळवारी) झाली. मार्केट यार्ड येथील संघाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला 21 पैकी 19 संचालक उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, तर निवडणूक निरीक्षक म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी काम पाहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी नेत्यांच्या मार्गदर्शनात ही निवड प्रक्रिया झाली.

नवनिर्वाचित संचालक मंडळात मनीष दळवी (भाजप, मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), केशव मानकर (भाजप, भंडारा-गोंदिया), दामोदर नवपुते (भाजप, औरंगाबाद-जालना), पोपटराव सोनावणे (राष्ट्रवादी, जळगाव-नंदुरबार-धुळे), रमेश शिंदे (राष्ट्रवादी, पुणे-सातारा), अशोकराव डख (राष्ट्रवादी, बीड-उस्मानाबाद), संजय कामनापुरे (राष्ट्रवादी, नागपूर-वर्धा), संदीप काळे (राष्ट्रवादी, राखीव), रंजना कांडेलकर (राष्ट्रवादी, राखीव), पंढरीनाथ थोरे (राष्ट्रवादी, राखीव), यशवंतराव जगताप (काँग्रेस, सोलापूर-सांगली-कोल्हापूर), आनंदराव जगताप (काँग्रेस, यवतमाळ), दिनेश चोखारे (काँग्रेस, चंद्रपूर-गडचिरोली), बाबाराव पाटील (काँग्रेस, राखीव), इंदुताई गुळवे (काँग्रेस, महिला राखीव), अंकुश आहेर (शिवसेना, परभणी-हिंगोली), सेवकराम ताथोड (शिवसेना, अकोला-बुलढाणा), ज्ञानेश्वर नागमोते (शिवसेना, अमरावती-वाशीम) यांचा समावेश आहे.

Balasaheb Nahata, Santosh Suryawanshi
नगरनंतर राष्ट्रवादीच्या रडारावर श्रीगोंद्यातील दरेकर व नाहाटा 

"वसंतदादा पाटील यांनी बाजार समिती संघाची स्थापना केली. त्यांनी भूषविलेल्या पदावर बसण्याची संधी मला मिळाली, हे भाग्य आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही करणार आहोत. कोरोना, तसेच केंद्र सरकारने आणलेली नवी धोरणे यामुळे शेतकरी, बाजार समित्यांपुढे काही आव्हाने आहेत. विभागवार प्रश्न समजून घेत त्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 301 बाजार समित्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही यापुढे काम करू."

- बाळासाहेब नाहाटा, सभापती, बाजार समिती संघ

"शिवसेनेला सहकारामध्ये उपसभापती पद मिळाले, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांचे, संचालकांचे आभार मानतो. या सहकारी संघात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून भाजपनेही मदत केली. राज्यातील सर्व बाजार समिती आणि राज्य शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न यापुढील काळात महासंघ करेल. पणन संचालक मंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी."

- संतोष सोमवंशी, उपसभापती, बाजार समिती संघ

Balasaheb Nahata, Santosh Suryawanshi
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

श्रीगोंदे तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढणार

श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी व त्याजवळील परिसरात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांची ताकद आहे. या ताकदीला शह देण्यासाठी बाळासाहेब नहाटा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य बाजार समिती संघाचे राष्ट्रवादीकडून सभापती बनविल्याची चर्चा अहमदनगर जिल्ह्यात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com