केंद्रात मोदी-शहा तर राज्यात टरबुज्या-पिस्तुल्यामुळे राजकीय संस्कृतीची वाट लागली

मेहबूब शेख ( Mehboob Sheikh ) यांनी श्रीरामपुरात काँग्रेस भवन येथे युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
केंद्रात मोदी-शहा तर राज्यात टरबुज्या-पिस्तुल्यामुळे राजकीय संस्कृतीची वाट लागली
Mehboob SheikhSarkarnama

महेश माळवे

श्रीरामपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त शरद युवा संवाद यात्रेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख ( Mehboob Sheikh ) यांनी श्रीरामपुरात काँग्रेस भवन येथे युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मेहबूब शेख यांनी भाजपच्या केंद्र व राज्यातील नेत्यांवर जोरदार टीका केली. ( With Modi-Shah at the center and Tarbuja and pistulya in the state, political culture awaited )

मेहबूब शेख म्हणाले, 2014 पासून भाजपमध्ये हम दो हमारे दो आहे. केंद्रात नरेंद्र मोदी व अमित शहा, तर राज्यात टरबूज्या आणि पिस्तुल्या आले. आणि सगळ्या राजकीय संस्कृतीची वाट लावली, असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला.

Mehboob Sheikh
...तर स्वतःच्या हातानं चौकात गळफास लावून घेईल - मेहबूब शेख

ते पुढे म्हणाले की, भाजप विरोधी देशातील सर्व नेते शरद पवारांचे नेतृत्व मान्य करतात. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या सर्वाधिक कारवाया सुरू आहेत. यातून पक्षाला बदनाम केले जात असल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला.

ओबीसी आरक्षण संदर्भात शेख यांनी सांगितले की, भाजपचे सध्या ओबीसी आरक्षणाविषयी पुतणा मावशीचे प्रेम सुरू आहे. मध्यप्रदेशला इम्पेरिकल डेटा दिला जातो. मात्र, राज्य सरकारला तो नाकारला जातो. व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात ओबीसी आरक्षणासाठी स्थापन झालेल्या मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्याने राज्याला आरक्षण मिळाले होते. त्यावेळी भाजपने देशभर कमंडल यात्रा काढून याला विरोध दर्शविला होता. भाजपला कोणतेच आरक्षण मान्य नाही. तसेच त्यांना संविधान ही मान्य नाही, असा आरोप त्यांनी केला.

Mehboob Sheikh
"राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा, कोणत्या मस्तीत आहे हा?" : चित्रा वाघ संतापल्या

ज्या गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी 90च्या दशकात भाजप पक्ष वाढवला. अशा मुंडे यांच्यावर दोनदा पक्ष सोडण्याची वेळ आली. 2009 ते 2014 विरोधी पक्षनेते राहिलेले व 40 वर्षे पक्षवाढीसाठी खर्ची घातले, अशा खडसेंना बाजूला करून फडणवीसांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवले. आज पक्षाचा विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री बनतो. मात्र, खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे चौकशी लावली जाते. मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धेत असलेल्या सर्व नेत्यांना फडणवीसांनी बाजूला केल्याचा आरोप शेख यांनी केला.

खडसे, अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडी व सीबीआयचे छापे टाकले जात आहेत. सध्या राज्यात आजपर्यंतच्या इतिहासात हे कधीच पाहायला मिळाले नव्हते असे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे 2024 ला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगली किंवा भारत-पाकिस्तान लढाई झाल्यास नवल वाटायला नको, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.

Mehboob Sheikh
भाजप नेत्याने पक्षाच्या बैठकीत बंदूक काढली!

हल्ली व्हाट्सऍप युनिव्हर्सिटीमधून चुकीचे संदेश सर्वत्र पाठवले जातात. मागील 70 वर्षांत काय केले ते असे काही सांगतात की, 2014 नंतरच अनेक शोध लागले. तत्पूर्वी लोक आदिवासी सारखे जीवन जगत होते, अशी उपहासात्मक टीका करत ते म्हणाले, मागील 70 वर्षांत एलआयसी, रेल्वे, विमान यासारख्या कंपन्या पंतप्रधान झाल्यावर मोदी यांनी विकायला काढल्या त्या स्थापन झाल्या होत्या. आमची जिन्स घालणारी पिढी त्याच विद्यापीठात शिकत आहे. त्यामुळे त्यांना कोणी काय काम केले हे सांगण्याची जबाबदारी आता राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांवर असल्याचे शेख यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, साई संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक, कपिल पवार, सचिन पवार, अर्चना पानसरे, कैलास बोर्डे, सतीश कोळगे, प्रियंका जानवेजा, मल्लू शिंदे, सुरेश निमसे, निखिल सानप, संदीप चोरगे, सोयब शेख आदी उपस्थित होते.

Mehboob Sheikh
संगमनेर तालुक्यातील लोकांना भोकाडी दाखविण्याचे दिवस आता संपले...

नोटीसनंतर भूमिकेत बदल

भाजपची पूर्वी एमआयएम ही बी टीम, तर आता एमएनएस (मोदी नकलाकार सेना) ही सी टीम आहे. मोदींनी जी आश्वासने दिली, त्याची पूर्तता न झाल्याने टीका केली जात होती. मात्र, इडीची नोटीस आल्यानंतर भोंग्यावाल्या बाबाने 'लाव रे तो व्हिडिओ' ऐवजी 'बंद करा तो भोंगा' म्हणत भूमिका बदलल्याचा आरोप राज ठाकरे यांचे नाव न घेता शेख यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in