पंतप्रधान मोदींनी ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट पाहावा, यासाठी प्रयत्न करणार : अमोल कोल्हे

दसऱ्याच्या मुहूर्तावर जगदंब क्रिएशनचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol KolheSarkarnama

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), तसेच सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट पाहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार आणि चित्रपट निर्माते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सोलापुरात बोलताना सांगितले. (Will try to make Modi watch 'Shivpratap Garudzep' movie : Amol Kolhe)

दसऱ्याच्या मुहूर्तावर जगदंब क्रिएशनचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डॉ कोल्हे हे आज (ता. २६ सप्टेंबर) सोलापुरात आले होते. त्याच वेळी हा चित्रपट पंतप्रधानांना दाखवणार असल्याचे स्पष्ट केले.

Dr. Amol Kolhe
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अन्‌ भाजपचे बडे नेते महिन्यांत तिसऱ्यांदा आले एकत्र!

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेचा थरार ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं चित्रपटाचे निर्माते आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Dr. Amol Kolhe
गुलाम नबी आझादांनी केली नवीन पक्षाच्या नावाची घोषणा; झेंड्याचेही अनावरण

पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदारांना हा चित्रपट पाहायला मिळावा, यासाठी ही प्रयत्न कारणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. डॉ. कोल्हे हे आज 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाच प्रमोशन करण्यासाठी सोलापुरात आले होते.

Dr. Amol Kolhe
सपाटेप्रकरणी राष्ट्रवादीने बोलावली बैठक; अंतर्गत वादावरही अजितदादा घेणार झाडाझडती

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांनी या अगोदर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास पुढे आणला होता. ती मलिका प्रचंड गाजली होती आणि त्यात संभाजी महाराजांची भूमिका ही डॉ अमोल कोल्हे यांनी साकारली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळविला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in