यापुढे जावळीत अधिक लक्ष देणार : शशीकांत शिंदे

जिल्हा बँकेच्या DCC Bank निवडणुकीत Election माझा पराभव झाला म्हणून काही जण आनंदाने नाचले. राजकारणात हार-जीत होत असते.
Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale
Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale Sandip Gadve, reporter

केळघर : मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने पक्षाचा आदेश म्हणून मी कोरेगाव मतदारसंघात गेलो. मात्र, जावळी तालुक्यातील सामान्य जनतेने मला राज्याच्या राजकारणात मोठी ताकद दिली असून तालुक्याचा सुपुत्र म्हणून जावळीत यापुढे अधिक लक्ष देऊन प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

वरोशी येथे आदर्शमाता इंदुमती केशवराव मोकाशी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, अमित कदम, संजय घोरपडे, सरपंच विलास शिर्के, बाबुराव कासुर्डे, हनुमंत शिंगटे, बुवासाहेब पिसाळ, साधू चिकणे, बाजीराव धनावडे, सुनील देशमुख, सुरेश कासुर्डे,सचिन बैलकर, जितेंद्र कासुर्डे, आतिष कदम आदींची उपस्थिती होती.

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale
शशीकांत शिंदे म्हणतात, मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय...

शशीकांत शिंदे म्हणाले, ''आपल्या आईने आपल्याला घडवले, संस्कार देऊन मोठे केले. याची जाणीव ठेवून वरोशी येथे गेल्या पाच वर्षांपासून विजयराव मोकाशी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आपल्या आईच्या नावे इंदुमती केशवराव मोकाशी पुरस्कार परिसरातील आदर्श मातांना देत आहेत. त्यांचा हा उपक्रम आदर्शवत आहे.

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale
शशीकांत शिंदे म्हणाले, काहींच्या स्वभावाला औषध नाही

आमदार शिंदे म्हणाले, मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने मला कोरेगावमध्ये जावे लागले. विधानसभेचा मतदारसंघ बदलला नसता तर धरण कृती समितीला आंदोलन करण्याची वेळ मी येऊ दिली नसती. आर. आर. पाटील ग्रामविकासमंत्री असताना सर्वप्रथम मी केडंबे येथे पाणी परिषद घेऊन बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सर्वप्रथम मांडला होता. आमच्या हक्काचे सहा टक्के पाणी उपलब्ध असताना हे धरण का रखडले आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटून धरणाचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून पाठपुरावा करणार आहे.

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale
संभाजीराजे, उदयनराजे अन् शिवेंद्रराजे येणार एकत्र

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला म्हणून काही जण आनंदाने नाचले. राजकारणात हार-जीत होत असते. ऐतिहासिक जावळी तालुक्यातील जनतेने मला मोठे केले याची जाणीव ठेवून यापुढे जावळीतील प्रलंबित कामे पूर्ण करणार आहे. केळघर विभागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत आणणार आहे. विधान परिषदेच्या सभागृहात बोंडारवाडी धरणाचा प्रश्न उपस्थित करणार आहे. कृती समितीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. यावेळी इंदुमती मोकाशी आदर्शमाता पुरस्कार लक्ष्मी तुकाराम कासुर्डे व लक्ष्मी विश्वास कासुर्डे यांना आमदार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विजयराव मोकाशी यांनी स्वागत केले. विलास शिर्के यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in