Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे लढवणार का? अमित ठाकरेंनी सांगितलं..

Politics : अमित ठाकरे हे सातारा दौऱ्यावर आहेत...
Amit Thackeray
Amit Thackeray Sarkarnama

Politics : मनसेचे विद्यार्थी संघटन मजबूत व्हावे, यासाठी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरु आहे. दरम्यान, 'कोकण, मराठवाडा, पुणेनंतर सातारा, कोल्हापूरचा दौरा सुरु आहे. या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन पक्ष बांधणी सुरु आहे. सातारा जिल्ह्यात ही निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हेच घेणार आहेत, असे मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सांगितले.

अमित ठाकरे हे शनिवारपासून सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात केली. विश्रामगृहावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, शहराध्यक्ष राहूल पवार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Amit Thackeray
Bharat Jodo Yatra : काँग्रेसने 'भारत जोडो' यात्रेतून नेमकं काय मिळवलं?

अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले, 'जिल्ह्यात मनसेची पुर्नबांधणी सुरु आहे. महाराष्ट्रातील हा सातव्या टप्प्यातील दौरा सुरु झाला आहे. साताऱ्यातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली तेव्हा अनेक प्रश्न समोर आले. ग्रामीण भागातील मुलींना शाळेला येण्यासाठी वेळेवर एसटी बस नाही. त्यामुळे मुलींना शिक्षण घेताना समस्या येत असल्याचे दिसून आले. तसेच मुलींना महाविद्यालयातून पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्या थांबायला हव्यात'', असे ते म्हणाले.

''महाविद्यालयीन विद्यार्थी यांना अनेक अडचणी, समस्या आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी महाविद्यालयाच्या बाहेर विविध फलक लावून तेथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर लिहण्यात येणार आहेत. अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉल केल्यानंतर त्यांना मदत देण्याचा प्रयत्न राहील'', असंही ते यावेळी म्हणाले.

Amit Thackeray
Rupali Thombare : भाजपकडून आचारसंहितेचं उल्लंघन; रुपाली ठोंबरेंनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

पक्षाची बांधणी म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी म्हणायची का? असा प्रश्न विचारला असता त्यावर अमित ठाकरे म्हणाले, ''पक्षाची बांधणी सुरु असली तरी निवडणुका कधी होतील हे माहीत नाही. पण, सातारा जिल्ह्यात ही निवडणूक लढवायची की नाही हे राज ठाकरे हेच ठरवणार आहेत.

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लढवायची की, नाही याबाबतचा निर्णय मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेच घेणार आहेत. त्यामुळे आता फक्त पक्षाची वास्तव पाहून काही निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये पक्षातून कोणाला काढण्याचा हेतू नाही. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्रीय करण्याचा प्रयत्न सुरु आहे'', असे अमित ठाकरे यांनी सांगितले.

Amit Thackeray
Politics : बारामतीतून 14 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणार; शिवतारेंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

''सातारा शहर व जिल्ह्यात गेल्या आठवड्यात क्राईम रेट वाढला आहे. यामध्ये विशेष करुन युवकांचे मोठे प्रमाण आहे. गेल्या आठवड्यात गोळीबार, कोयता गॅग दहशत यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. यासाठी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध महाविद्यालयामध्ये लवकरच समुपदेशन मार्गदर्शन शिबीरे घेण्यात येणार आहे'', असे अमित ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com