बालेकिल्ल्यात विखेंना महाविकास आघाडी आव्हान उभे करणार?
MLA Radhakrushn Vikhe PatilSarkarnama

बालेकिल्ल्यात विखेंना महाविकास आघाडी आव्हान उभे करणार?

शिर्डीत ( Shirdi ) अनेक वर्षांपासून विखे ( Vikhe ) कुटूंबाचे वर्चस्व राहिले आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, शिर्डी, कर्जत व अकोले या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम काल ( बुधवारी ) राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमानुसार 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिर्डीत अनेक वर्षांपासून विखे कुटूंबाचे वर्चस्व राहिले आहे. Will Mahavikas Aghadi challenge Vikhe in Balekilla?

शिर्डी नगरपंचायत ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची नगरपंचायत समजली जाते. या नगरपंचायतमध्ये 17 नगरसेवक आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला 9, भाजपला 3, राष्ट्रवादी काँग्रेसला 1, शिवसेनेला 1, मनसेला 1 व अपक्षकडे 2 नगरसेवक होते. त्यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसने एकहाती विजय मिळविला होता. आता विखे पाटील भाजपमध्ये आहेत. त्यांच्या बरोबर काँग्रेसचे बहुतांश नगरसेवकही असणार आहेत.

 MLA Radhakrushn Vikhe Patil
नगर अग्निकांड : चौकशीचा केवळ फार्स नको; दोषींवर कारवाई व्हावी : राधाकृष्ण विखे

अशा स्थिती मागील दोन वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या युवक आघाडीने शिर्डीत पक्ष संघटन मजबूत करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचीही शिर्डीतील काही भागांत ताकद आहे. त्यामुळे शिर्डीत तरी भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत दिसणार आहे.

कोते व गोंदकर या दोन कुटूंबीयां भोवतीच शिर्डीतील राजकारण फिरत आले आहे. विखे पाटलांनी श्रीरामपूर येथील भाजप कार्यकर्यांच्या मेळाव्यात भाजपच्या चिन्हावरच आगामी निवडणुका होतील हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थानिक पॅनल पेक्षा पक्षीय राजकारण शिर्डीत दिसण्याची शक्यता आहे. भाजप व विखे एकत्र आल्याने विखे व पर्यायाने भाजपचे ताकद वाढली आहे. शिर्डीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मजबूत संघटन आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in