शिवेंद्रबाबा, गोरेंना दिलेला शब्द फडणवीस यावेळेस तरी पाळणार का?

एकनाथ शिंदे Eknath Shinde -देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis सरकारचा पुढचा मंत्रिमंडळ विस्तार Cabinet Expansion ऑक्टोंबरमध्ये होणार असून त्यावेळी २४ जणांना 24 Minister मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे.
Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis, Jaykumar Gore
Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis, Jaykumar Goresarkarnama

सातारा : मंत्रीमंडळाच्या विस्तारात साताऱ्यातून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असून दोघांनाही श्री. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी मंत्रीपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे यावेळेस तरी फडणवीस शब्द पाळणार का, याची सातारकरांना उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यात शिंदे आणि फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती. यामध्ये साताऱ्यातून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून संधी मिळाली. पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे आणि भाजपतील काही आमदार नाराज झाले होते.

Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis, Jaykumar Gore
Satara : डाॅल्बी वाजलीच पाहिजे... दोन तासांत काय आभाळ कोसळणार का... उदयनराजे भडकले

शिंदे गटातील आमदारांनी ती बोलून दाखवली होती. भाजपच्या आमदारांनी मात्र, पक्ष आदेशच्या नावाखाली शांत राहणे पसंत केले होते. आता या नाराज आमदारांना खूष करण्यासाठी दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा पुढचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोंबरमध्ये होणार असून त्यावेळी २४ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. यामध्ये नशीबवान आमदार कोण ठरणार, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis, Jaykumar Gore
Satara : सातारा लोकसभेतून भाजपचाच खासदार निवडून येणार.. जयकुमार गोरे

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मंत्रीपद देण्याबाबतचा शब्द दिला होता. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राजघराण्यातील आहेत. आता त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची भाजपला संधी आली आहे. ते श्री. फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis, Jaykumar Gore
सातारचा पालकमंत्री कोण : शिवेंद्रसिंहराजे की शंभूराज देसाई

तसेच दुसरे माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना देखील श्री.फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत माणमधील प्रचारसभेत मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. तसेच मंत्री होण्यातील त्यांच्यापुढील सर्व अडचणीही आता दूर झालेल्या आहेत. आमदार गोरेंवर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.

Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis, Jaykumar Gore
जानकरांना हवंय कॅबिनेट मंत्रीपद : सोबत घ्यावे की नाही ते भाजपने ठरवावं

आता मंत्रीपद देऊन त्यांना कॅबिनेट मंत्री पद देऊन भाजपकडून त्यांना बढती दिली जाऊ शकते. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला अडविण्यात आमदार गोरेंच्या माध्यमातून चांगला प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा विचार होऊ शकतो. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात यावेळी २४ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. यामध्ये नशीबवान आमदार कोण ठरणार, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in