Ahmednagar News: जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी; चंद्रशेखर घुले सोडणार राष्ट्रवादीची साथ?

Ahmednagar District Central Bank: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला.
Chandrashekar Ghule
Chandrashekar Ghule Sarkarnama

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणुकी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला. हा पराभव घुलेंना चांगलाच जिव्हारी लागल्याची चर्चा सुरु असतानाच आता घुले राष्ट्रवादी (NCP) सोडणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (Will Chandrasekhar Ghule leave the support of NCP due to the defeat in the district bank)

विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, २०१९ मध्ये पक्षाने उमेदवारी नाकारली आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फक्त एका मताने अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यामुळे व्यथित झालेले चंद्रशेखर घुले वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी (१२ मार्च) त्यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर मंगळवारी (१४ मार्च) शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता घुले काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chandrashekar Ghule
Eknath Shinde News: कांदा उत्पादकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देणार

जिल्हा बँकेतील पराभवामुळे घुलेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्या संचालकांची मते फुटली त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीच घुलेंच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना यासाठी याला जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही घुले समर्थकांकडून करण्यात येत आहे. या कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठीच घुलेंनी शेवगावमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

मतदार संघातील विविध प्रश्नांच्या दृष्टीने आणि आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्यात मी भुमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.त्यानुसार शेवगावमध्ये मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा पार पडेल.दरम्यान, मधल्या काळात घुले यांच्या कुटुंबात राजश्री घुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते.

त्यानंतर आता विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले यांना पक्षाची उमेदवारी दिली दिली जाणार असल्याची शक्यता आहे.अलीकडेच त्यांना जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. मात्र तिथेही पराभव झाल्याने ते पुन्हा बॅकफूटवर गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com