Satyajeet Tambe News : ...तर सत्यजित तांबे यांचा प्रचार करू : राधाकृष्ण विखे पाटलांनी दाखवली तयारी

नगरच्या राजकारणात विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे एकमेकांचे राजकीय स्पर्धक आहेत.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

सोलापूर : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघासाठी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, भाजपच्या (BJP) पक्ष नेतृत्व त्यांना संधी दिली तर तांबे यांचा प्रचार आपण करू, असे नगर आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. (Will campaign for Satyajit Tambe if BJP gives support : Radhakrishna Vikhe Patil)

दरम्यान, नगरच्या राजकारणात विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे एकमेकांचे राजकीय स्पर्धक आहेत. सत्यजित तांबे हे थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व कोणाला संधी देईल, त्यांचा प्रचार करू असे सांगून तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला तर त्यांचा प्रचार करण्याची आपली तयारी आहे, असे विखे यांनी स्पष्ट केले.

Radhakrishna Vikhe Patil
Lok Sabha Election : भाजपला २०२४ मध्ये बहुमत मिळणे अवघड; प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका बजावणार : नोबेल विजेत्या शास्त्रांचे निरीक्षण

नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने कोणाला पाठिंबा दिला आहे, त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. मात्र, सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजप पक्ष नेतृत्व कोणाला संधी देईल, त्याचा प्रचार आपण करू. मात्र, अचानक या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे संभ्रमावस्था आहे, असेही विखे यांनी नमूद केले.

Radhakrishna Vikhe Patil
Shetti-Patil News : भालकेंच्या ‘त्या’ विधानानंतर राजू शेट्टी-अभिजित पाटलांची बंद खोलीत तासभर चर्चा

विखे पाटील म्हणाले की, सत्यजित तांबे यांच्या वडिलांनी (डॉ. सुधीर तांबे) तीन वेळा मतदार संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यातच त्यांची मतदार नोंदणी चांगली झालेली आहे. असे सर्व असताना सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज माघारी का घेतला, हे माहिती नाही. मात्र, सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांचा या सर्व कृतीला आतून पाठिंबा आहे का, याबाबत शंका आहे. थोरात यांनी या सर्व गोष्टींबाबत खुलासा केला पाहिजे. ते चुप्पी साधून का आहेत, हेच कळत नाही.

Radhakrishna Vikhe Patil
Nashik Graduate Constituency : उद्धव ठाकरे नाशिकमध्ये भाजपवर डाव उलटवणार : ‘या’ उमेदवाराला देणार पाठिंबा?

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बाराबंदीची वेशभूषा करून सिद्धरामेश्वराच्या यात्रेत सहभागी झाले होते. त्याबाबत त्यांनी सांगितले की, सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत सहभागी होता आले, त्यामुळे माझ्या दृष्टीने आज माझ्या जीवनातील भाग्याचा दिवस आहे. पारंपारिक बाराबंदी वेशामध्ये डोक्यावर पगडी बांधून सिद्धेश्वरांच्या यात्रेत सहभागी होणं, हा एक आनंदाचा दिवस आहे.

Radhakrishna Vikhe Patil
मोठी बातमी : राष्ट्रवादीला मोठा धक्का; लोकसभेतून खासदार बडतर्फ, संख्याबळ घटले

सिद्धारामेश्वरांचे दर्शन घेणे ही माझ्यासाठी एक वेगळी अनुभूती होती. सिद्धरामेश्वरांकडे एवढंच मागणं मागितलं की, लोकांना चांगले आरोग्य आणि सुख शांती लाभो. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच यात्रा भरली होती, असेही विखे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in