तोळामासाची काँग्रेस सत्यजित देशमुखांना कोणत्या पदाचा शब्द देणार?

शिराळा तालुक्याचे भाजप नेते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सत्यजीत देशमुख यांच्यापुढे सध्या पेच दिसतो आहे.
Satyajeet Deshmukh
Satyajeet DeshmukhSarkarnama

सांगली : शिराळा तालुक्याचे भाजप (bjp) नेते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सत्यजीत देशमुख (Satyajeet Deshmukh) यांच्यापुढे सध्या पेच दिसतो आहे. भाजपने शिराळा मतदार संघात महाडिकांना पुढे चाल देण्याचे धोरण जाहीर केले आहे. विधान परिषदेला भाजपची प्रतिक्षा यादी आधीच मोठी आहे. त्यात सत्यजित यांचा नंबर खूप लांबचा आहे. या स्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये (congress) परतून हाती काय लागणार?, हे मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. परिणामी, देशमुख यांची भूमिका काय असणार?, याकडे तालुक्याचे लक्ष असेल. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपचा एक नेता लवकरच काँग्रेसमध्ये परतणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर देशमुख यांच्याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झालेली आहे. (Will BJP leader Satyajeet Deshmukh rejoin Congress?)

सत्यजीत देशमुख काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शिराळा विधानसभा मतदार संघात भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजीराव देशमुख यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण होते. देशमुखांचा प्रवेश नाईकांना तारणारा ठरेल, असा भाजपचा कयास होता. पण, महाडिक यांनी येथे बंडखोरी केल्याने भाजपची सगळीच गणिते चुकली. शिवाजीराव नाईक पराभूत झाले.

Satyajeet Deshmukh
शिवसेनेत वाद पेटला : महिला शिवसैनिकांकडून शहरप्रमुखाला शाखेतच मारहाण

भाजप प्रवेश करताना सत्यजित यांनी राजकीय पुनर्वसनाच्या अटी घातल्या नव्हत्या. त्यांचे वडील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. तेथे त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. भाजपने त्या जागी कडेगावच्या पृथ्वीराज देशमुख यांना संधी दिली. शिवाजीराव नाईक आता राष्ट्रवादीत गेले आहेत. पण, सत्यजित यांना विधानसभेला संधी मिळेल, असे नाही. भाजपमधील प्रमुख दावेदाराने पक्ष सोडल्यानंतर सत्यजीत यांना विधान सभेसाठी संधी मिळेल, असे दिसत नाही. महाडिक दावेदार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना ‘सॉफ्ट सिग्नल’ दिला आहे. या स्थितीत सत्यजीत देशमुख यांच्यासाठी राज्याच्या राजकारणातील स्पेस कठीण दिसत आहेत.

Satyajeet Deshmukh
'चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये केलेल्या दगाफटक्याचा शिवसैनिकांनी बदला घेतला'

विधान परिषदेसाठी दोन महिन्यांनी निवडणूक होईल. त्यात भाजपला चार जागा मिळतील. त्यात प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विनायक मेटे अशा दिग्गजांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. यामध्ये सत्यजित यांचा नंबर लागेल का हे काळच ठरवेल. ते सांगली जिल्हा बँकेचे संचालक आहेत, हीच जमेची बाजू आहे. आता त्यांनी पक्षांतर करावे, पुन्हा काँग्रेसमध्ये परतावे, तर काँग्रेसची स्थिती तर स्वबळावर पुन्हा राज्यात सत्तेत येण्याची दिसत नाही. त्यामुळे हाती काय लागणार? शिराळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. पुढील विधानसभा काँग्रेसने स्वतंत्र लढायचे ठरवले, तरच सत्यजित यांना तिथे काही एक संधी राहतील. मात्र, भाजप व राष्ट्रवादीच्या महायंत्रणेचे आव्हान पाहता हा रस्ता धरायचा का?, याबद्दल दहावेळा विचार करण्यासारखी स्थिती आहे.

Satyajeet Deshmukh
इंदापूरकरांनी घरी बसवलेले कोल्हापुरात भाजपच्या प्रचाराला गेले होते : भरणेंचा पाटलांना टोमणा

जिल्ह्यात काँग्रेस नेतृत्वाची पोकळी आहे. विशेषतः वाळवा, शिराळा तालुक्यात अवस्था बिकट आहे. राज्यातही दुसऱ्या फळीची नव्याने बांधणी करण्याची गरज आहे. त्याबाबत सत्यजीत यांना काँग्रेस काही ठोस आश्वासन देणार असेल तर काही आश्‍वासन मिळाले तर ते विचार करतीलच. पण सध्या तरी त्यांनी ‘जिथे आहे, तेथे ठीक आहे’, अशी भूमिका घेतली आहे.

शिराळ्याची परिस्थिती पाहून सत्यजित निर्णय घेतील?

जिल्ह्यात राष्ट्रवादीने विस्ताराचा झपाटा लावला आहे. काँग्रेस अद्याप ॲक्शन मोडमध्ये नाही. मात्र, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना विस्तारवादी धोरण राबवावे लागेल. त्यात सत्यजीत देशमुख यांच्यासाठी अग्रक्रमाने विचार केला जाऊ शकतो. अर्थात, राज्यातील सध्याची गोंधळाची स्थिती, शिराळा मतदार संघातील मांडणी पाहणा सत्यजीत देशमुख कोणताही निर्णय घाईत करतील, असा सध्या तरी दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com