संग्राम जगताप विधानसभेत मतदानाला का पोहोचले नाहीत.. त्यांनीच सांगितला अनुभव!

विधानसभेची दारे बंद केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्यासह सुमारे 15 आमदारांना मतदान करता आले नाही.
Sangram Jagtap
Sangram JagtapSarkarnama

अहमदनगर - शिंदे गट व भाजपने आज ( सोमवारी ) विधानसभेत बहुमत सिद्ध केले. बहुमतासाठी झालेल्या मतदानाच्या वेळी विधानसभेची दारे बंद केल्यामुळे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्यासह सुमारे 15 आमदारांना मतदान करता आले नाही. या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झालेली हकीकत 'सरकारनामा'ला सांगितली. ( Why Sangram Jagtap did not reach the polls in the assembly .. He is the one who shared the experience! )

आमदार संग्राम जगताप म्हणाले, आम्हाला विधानसभेत जाण्यासाठी अवघा अर्धा मिनिट उशिर झाला. तोच विधानसभेची दारे बंद करण्यात आली. आम्हाला वेळेत दरवाजे बंद करणार असे वाटले नव्हते, असे आश्चर्यही त्यांनी व्यक्त केले.

Sangram Jagtap
आमदार संग्राम जगताप म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी बरोबरच...

ते पुढे म्हणाले की, आम्हा सुमारे 12 ते 15 आमदार होतो. आम्ही सर्व विधानसभेच्या प्रांगणात दाखल झालो होतो. एकत्रितपणे सभागृहात चाललो होतो. मात्र त्याच वेळी दरवाजे बंद झाल्याने आम्हाला सभागृहा बाहेर आमदारांसाठी असलेल्या लॉबित बसावे लागले. त्यामुळे आम्हाला मतदान करता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sangram Jagtap
थोरात, लंके, संग्राम जगताप, रोहित पवारांसंदर्भात सुजय विखेंनी केले हे वक्तव्य

कालपर्यंत महाविकास आघाडीची विधानसभा अध्यक्ष होते. त्यांनी लगेच दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले नाहीत मात्र अध्यक्ष बदलताच त्यांनी दरवाजे बंद केले. मतदानाच्या वेळी असे वेळेवर 11 वाजताच दरवाजे बंद केले जात नाहीत. 11.30च्या पुढे मतदान प्रक्रिया सुरू होते. आम्हाला कल्पना नसल्याने मतदान करता आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे मतदान 100ही भरले नाही. मतदान प्रक्रिया झाल्यावर दरवाजे उघडण्यात आल्यावर आम्हाला सभागृहात प्रवेश मिळाला, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in