Shahajibapu Patil : माझ्या मर्दानगीचं खडसेंना एवढं काय वेड लागलंय?, शहाजीबापूंचा पलटवार!

Shahajibapu Patil : 'बायकोला साधी साडीही घेऊ शकत नाही, तो कसला मर्द?”
Shahajibapu Patil
Shahajibapu Patil Sarkarnama

सांगोला : “बायकोला साधी साडीही घेऊ शकत नाही, तो कसला मर्द?”,अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी सांगोल्याचे झाडी -डोंगर फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर केली होती. आता या टिकेला शहाजीबापूंकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ खडसेंना माझ्या मर्दानगीचं एवढं काय वेड लागलंय, माझी मर्दानगी तपासू नको म्हणावं, मी कुठल्याही सरकारी संपत्तीवर डल्ला मारून संसार केला नाही. माझे हात पापाने बरबटलेले नाही. ज्यांचे हात पापाने बरबटलेत त्याला भगवंताने नीट चालायला सुद्धा लावलं नाही, खरं तर त्यांनी असं बोलू नये, माझ्यावर बोलण्याची त्यांना काहील गरज नव्हती, अशी जिव्हारी लागणारी टीका शहाजीबापू यांनी केली आहे

Shahajibapu Patil
कोश्यारी राज्यपालपदावरून गेले अन् सुमित्रा महाजन राज्यपाल झाल्या, दोन्हीही अफवाच!

मला मिळालेली प्रसिद्धी हा माझ्या जीवनात घडलेला अपघात आहे. माझ्या पराभवाचं दु;खं, वेदना मी माझ्या मित्राशी बोललो. ते तसंच व्हायरल झालं. यामुळे माझं व्यक्तिगत जीवन समाजात आलं. हे सुद्धा फार चांगलं घडलं, असं मला वाटत नाही. माझ्या पराभवाच्या काळात घरचे हट्ट मला पुरवता आले नाही. अशा काळात मला माझ्या सासरवाडीने सांभाळून घेतलं. माझ्या मेहुण्यांनी मला सांभाळून घेतलं, असे शहाजीबापू यांनी सांगितले.

Shahajibapu Patil
Marathwada : आर्थिक चणचण असलेल्या सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राला मदत मागावी..

एकनाथ खडसे नेमके काय म्हणाले?

गुवाहाटीला गेले असता शहाजीबापूंची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये त्यांनी ‘बायकोला लुगडं घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नव्हते," अशी खंत व्यक्त केली होती.’याच त्यांच्या विधानावरून “बायकोलाही साडी घेऊ शकत नाही, तो कसला मर्द”,अशी बोचरी टीका खडसे यांनी शहाजी बापूंवर केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in