Phaltan : राजकारणात काम करण्यासाठी वेगळं शिक्षण लागत का...निंबाळकर

Ranjitsinh Nimbalkar आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या शिक्षणावरुन टीका केली होती. त्या टीकेला खासदार निंबाळकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

Phaltan News : राजकारणात काम करण्यासाठी वेगळं शिक्षण लागत का, असा प्रश्न उपस्थित करुन मी इलेक्ट्रीकल डिप्लोमा केलाय, याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. शिक्षणाचा आणि विकास कामांचा संबंध येत नाही, असे प्रतिउत्तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी रामराजेंना Ramraje Naik Nimbalkar दिले आहे.

सध्या फलटण मतदारसंघातील राजकारण गरम झाले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कलगीतूरा रंगला आहे. दोघेही एकमेकांवर सडेतोड टीका करु लागले आहेत. आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या शिक्षणावरुन टीका केली होती. त्या टीकेला खासदार निंबाळकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

खासदार निंबाळक़र म्हणाले, मी इलेक्ट्रीकल डिप्लोमा केलाय, याचा राजकारणाशी काय संबंध नाही. शिक्षणाचा आणि विकास कामांचा संबंध येत नाही. राजकारणात काम करण्यासाठी वेगळं शिक्षण असते का, हे मला माहिती नाही. खासदारांच्या दहा पिढ्या राजकारणात येऊ देणार नाही, असा इशाराही रामराजेंंनी दिला होता.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Phaltan : सर्व विकास कामांचे श्रेय रामराजेंना; मला श्रेयवादात पडायचे नाही : निंबाळकर

त्यावर खासदार रणजितसिंह म्हणाले, राजकारणात येण्यासाठी स्वत:ची इच्छा ही असावी लागते. माझ्या वडीलांची इच्छा होती, ते राजकारणात आले. त्यांनी सातारा जिल्ह्यासाठी काम केले. नीरा देवघर, उरमोडी, जिहे कठापूर, कवठे- केंजळ, वसना वांगना, आदी योजना मार्गी लावल्या. फलटण रेल्वे लाईन झाली. त्यामुळे माझी पुढची पिढी राजकारणात येईल का, हे मी देखील सांगू शकत नाही. तेवढीच त्यांची इच्छा असेल आणि तेवढेच त्यांचे सामर्थ्य असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Phaltan : सत्तांतराची स्वप्ने बघू नका; इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच : रामराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com