Shahaji Patil : अडीचशे मतंही मिळत नाहीत त्यांच्याबद्दल कशाला विचारता ? असं कुणाबद्दल म्हणाले शहाजीबापू !

Shahaji Patil : लक्ष्मण हाके आणि सांगोल्यातील इतर शिवसैनिकांनी पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे.
Shahaji Patil-Laxman Hake
Shahaji Patil-Laxman Hakesarkarnama

Shahaji Patil News : निवडणुकीत ज्यांना अडीचशे मतंदेखील मिळत नाहीत त्यांच्याबाबत मला कशाला विचारता असा प्रतिप्रश्‍न सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी आज विचारला.गणपतराव देशमुख, दीपक साळंखे यांच्यासारख्या नेत्यांबद्दल विचारलं तर मी बोलेन असंही त्यांनी स्पष्ट केलं. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या लक्ष्मण हाके यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर आमदार शहाजी पाटील यांनी वरील उत्तर दिल्याचे त्याची एकच चर्चा झाली.

लक्ष्मण हाके आणि सांगोल्यातील इतर शिवसैनिकांनी पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘‘ निवडणुकीत अडीचशे मतदेखील मिळवू न शकणाऱ्या आणि पुण्यात राहून माध्यमांना ‘बाईट’ देणाऱ्याबद्दल मला काय विचारता. मुळात कुणालाही जबाबदारी देताना त्याची पाश्‍र्वभूमीवर पक्षाने तपासायला हवी. उद्धव ठाकरे यांनी अशा लाकेांची व्यवस्थित माहिती घ्यायला हवी.अर्थात त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्‍न आहे. त्यावर मी अधिक बोलणार नाही.’’

Shahaji Patil-Laxman Hake
मोहोळमधून संधी मिळाली नसती, तर आज मी माळशिरसचा आमदार असतो : राष्ट्रवादी आमदार मानेंचा गौप्यस्फोट

आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांचा रोख लक्ष्मण हाके यांच्यावर होता. पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी असलेले हाके मूळचे सांगोला तालुक्यातील आहेत. ते सध्या पुण्यात राहतात. मात्र, बऱ्याचवेळा ते सांगोल्यातही असतात. हाके यांच्याबद्दल विचारताच आमदार पाटील स्पष्टच बोलले. ज्यांना निवडणुकीत अडीचशे मतंदेखील मिळत नाहीत. त्यांच्याबद्दल मला विचारू नका असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. हाके यांनी पूर्वी लढविलेल्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या कमी मतांचा संदर्भ यापूर्वीदेखील आमदार पाटील यांनी दिला आहे.

Shahaji Patil-Laxman Hake
भाजप खासदाराला अधिकारी चांगलाच भिडला; आपली बाजू मांडण्यासाठी चक्क अंघोळचं केली

दरम्यान, हाके (Laxman Hake) आणि सांगोला तालुक्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची सांगोल्यात सभा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण बंडात आमदार पाटील सक्रिय होते. काय हॉटेल, काय डोंगार, समदं कसं ओके ! या डायलॉगमुळे आमदार पाटील त्या काळात राज्यभर पोचले होते.त्यानंतरही आमदार पाटील यांनी माध्यमांकडे सातत्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने भूमिका मांडली आहे. त्यांनी अनेकवेळा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे सांगोल्यात ठाकरे यांची सभा व्हावी यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com