बंडखोर आमदार हे अजित दादांच्या नावाने खापर का फोडतात? : रोहित पवारांना सांगितले कारण

पुणे येथील शनिवारवाडा परिसरातील एका कार्यक्रमात आलेल्या आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

पुणे - राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता जाऊन शिंदे गट व भाजपची सत्ता आली आहे. अशा स्थितीत शिवसेनेत फुट पडण्यासाठी शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दोषी ठरविले जात आहे. यावर पुणे येथील शनिवारवाडा परिसरातील एका कार्यक्रमात आलेल्या आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले. ( Why do the rebel MLAs lash out in the name of NCP, Ajit Dada? : Told to Rohit Pawar because )

रोहित पवार म्हणाले, मी लहानपणी पासून अशाच पद्धतीने राहिलो आहे. जगलो आहे. या पुढेही मी असाच राहणार आहे. युवा वर्गात एखादा कलेत, एखादा खेळात चांगला असतो. त्यांच्याबरोबर सहभाग घेतला तर त्यांना काही प्रमाणात बरे वाटते. त्यांना पाहून मलाही ऊर्जा मिळते. त्यामुळे त्यांच्या बरोबर राहून काम करायला मला जास्त आवडते. मी स्वतःला नेता नव्हे तर कार्यकर्ता समजतो.

Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, हमारा भी टाईम आयेगा...

ते पुढे म्हणाले की, लोकांच्या संपर्कात राहणे फार महत्त्वाचे असते. ज्यावेळी एखादा निर्णय कोणी घेते. निर्णय का घेतला हे सांगायचे असे तर कोणती तरी कारणे शोधली जातात. महाराष्ट्रात जे घडले ते खरे कारणं असेल तर आपण समजू शकतो. चर्चा करता आली असती. मात्र वेगळे काही तरी घडलेले पहायला मिळाले. नंतर आमचे नेते संपर्कात नव्हते, राष्ट्रवादीमुळे अडचण झाली, ही कारणे सांगितली जात आहेत. त्यांच्या मतदार संघातील कार्यकर्ते शांत करण्यासाठी ही कारणे दिली जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

रामदास कदम यांच्या आरोपांवर त्यांनी सांगितले की, ते सक्रिय राजकारणात किती होते हे पहावे लागेल. मात्र ते मोठे नेते आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षात आहेत. शिंदे गटाचे आमदार जी कारणे देत आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवारांचे नाव पुढे करत आहेत. त्याच्या मागे एकच कारण आहे, की बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील शिवसैनिकांना शांत करणे हेच त्यांच्या मनात आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बोलून चालणार नाही. कारण त्यांच्यावरील आरोपांची झळ बंडखोरांनाच बसत आहे. शिवसैनिक संघटित होऊ लागला आहे. आदित्य ठाकरेंच्या ग्रामीण भागातील सभा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. त्यामुळे खापर राष्ट्रवादी, शरद पवार व अजित पवारांच्या नावावर फोडले जात आहे.

Rohit Pawar
रोहित पवार- राम शिंदे लढतीत सुरेश धसांचे महत्व कायम!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडा मागील खरा कलाकार कोण हे जगाला सांगितले आहे. ते जेव्हा एखाद्याला कलाकार म्हणतात त्यावेळी काल कसली होती तर पार्टी फोडण्याची कला होती. या 40 बंडखोर आमदारांना ताकद देण्याची कला होती. भाजपने मोठी ताकद लावली असेल व ते एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे मान्य केले असेल तर शिवसेनेला कोणी फोडले हे जग जाहीर आहे. त्यामुळे उगाच राष्ट्रवादीवर खापर फोडू नये, असे त्यांना सांगितले.

Rohit Pawar
धनुष्यबाण मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना गाठायचाय 188 चा आकडा!

युवकांना संधी

राज्यातील राष्ट्रवादीची ठराविक पदे सोडली तर काही ठिकाणी बदल करण्याची गरज आहे. युवकांना ताकद देण्याची गरज आहे. कारण येणारी निवडणूकच पक्षाला जिंकून देऊ शकते. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आदी नेत्यांचे मार्गदर्शन आहेच मात्र ताकद युवकांची लागणार आहे. त्यामुळे युवकांना ठिकठिकाणी संधी देणे आवश्यक आहे. पक्षात निश्चित युवकांना संधी दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खऱ्या शिवसेनेची मदत घ्या

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांची निवडणूक आहे. यात महाविकास आघाडीत शिवसेनेची भूमिका काय असेल यावर त्यांनी सांगितले की, राज्यातील जिल्हा व तालुक्यांतील जसे समीकरण असेल त्यापद्धतीने आपल्याला काम करावे लागेल. खऱ्या शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत खऱ्या शिवसेनेची मदत घेतली गेली पाहिजे. त्या-त्या ठिकाणी ती परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी तयार करताना समानकृती कार्यक्रम तयार केला होता. मात्र राज्यातील सत्ता गेल्याने कृती कार्यक्रम राहिलेला नाही. महाविकास आघाडी संघटन राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Rohit Pawar
पिचड विरुद्ध महाविकास आघाडी लढत रंगणार : अगस्ती कारखाना निवडणूक

कर्जत न्यायालयाचा प्रश्न

कर्जत न्यायालया बाबत आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. त्याचा निर्णय लवकरच मार्गी लागेल. इतर तालुक्यांत विरोधात असलेल्या आमदारांची कामे स्थगित झाली आहेत. ती कामे ही स्थगित करू नये अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. अजून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने कोणाकडे पाठपुरावा करायचा हा प्रश्न आहे. जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी पाठपुरावा करू. स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करू. सरसकट स्थगिती देणे राजकीय दृष्ट्या योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in