खानाच्या कबरीजवळील 'त्या' तीन कबरी कोणाच्या? इतिहास संशोधकांनी दिले उत्तर...

Afzal Khan's grave | अफजल खानाच्या या कबरीजवळीच आणखी तीन कबरी आढळून आल्याने या कबरी कोणाच्या असाव्यात, हा राज्यभरात उत्सुकतेचा विषय बनला आहे.
Afzal Khan's grave
Afzal Khan's grave

Afzal Khan's grave | सातारा :  प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमक स्थानिक प्रशासनाकडून हटवण्यात आले. या पाडकामाच्या वेळी अफजल खानाच्या या कबरीजवळीच आणखी तीन कबरी आढळून आल्याने या कबरी कोणाच्या असाव्यात, हा राज्यभरात उत्सुकतेचा विषय बनला आहे.

इतिहास अभ्यासक द बा पारसनीस यांच्या 1916 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील फोटोमध्ये एकच कबर असल्याचा फोटो आहे. पण, आता त्या ठिकाणी आणखी तीन कबरी समोर आल्या आहेत. याबाबत संभाजी ब्रिगेडने मोठा दावा केला आहे.

Afzal Khan's grave
Afzal Khan's grave : अफजल खानाच्या कबरीजवळ 'त्या' तीन कबरी कोणाच्या?

छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर त्याची कबर बांधली. पण या कबरीत अफजलखानाचे फक्त धड आहे. त्याचे मुंडकं राजगडावर दफन केल्याचे अने दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी जेधे शकावलीमध्ये याचा संदर्भ उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर संभाजी कावजी यांनी त्याचे मुंडके छाटले होते. हे मुंडके राजगडावर पिंजऱ्यात घालून ते राजगडाच्या बालेकिल्लात ठेवण्यात आल्याचे संदर्भ इतिहासात आढळतात. असेही इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.

याशिवाय, प्रतापगडावर सापडलेली तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी' यांची असावी, असा दावा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केला आहे. महाराजांनी खानाचा याचा वध केला तेव्हा तिथे त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हादेखील त्या ठिकाणी उपस्थित होता. ही तिसरी कबर कुलकर्णीची असावी. छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास जपला पाहिजे, असही संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com