ज्याच्यावर गुन्हा दाखल नाही, तो शिवसेनेचा शाखा प्रमुख होऊ शकत नाही...

मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थित शिवसेना कार्यकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे आज शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ), जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व विधानसभेतील माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थित शिवसेना कार्यकऱ्यांना मार्गदर्शन केले. ( Whoever has not been charged, cannot be the head of Shiv Sena branch ... )

गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्या जळगावला सगळी पाण्याची मंत्रीपदे मिळाली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री, मी गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री. ते चारीने पाणी द्यायचे मी पाईपने पाणी देतो. पारनेर तालुक्यात 26 पाणी योजनांना मी मान्यता दिली आहे. त्यातील 20 निविदा निघाल्या आहेत. लोकांना पाणी दिल्या शिवाय विरोधकांना पाणी पाजता येणार नाही. त्यामुळे विजय औटी यांनी कामाला लागावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Gulabrao Patil
गुलाबराव पाटील म्हणाले, निलेश राणे हे आमचं प्रोडक्ट...

ते पुढे म्हणाले, शिवसेनेचा कार्यकर्ता भावनाशील आहे. मी 30व्या वर्षी आमदार झालो. त्यावेळी मी जिन्सची पॅन्ट घालायचो. विधानसभेच्या दारात मला अडविले. मी म्हणालो मी आमदार आहे. तेव्हा पासून आमदारांना बॅच निघाले. त्याकाळात टोपीवाले, धोतरवाले पाहण्याची विधानसभेला सवय होती. ही सर्व बाळासाहेब ठाकरेंची किमया होती.

शिवसेनेला संपविण्यासाठी सर्वांनी विडा उचलला आहे. शिवसेना हा पक्ष नाही. शिवसेना ही संघटना नाही. शिवसेना हा विचार आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार दुनिया संपेपर्यंत संपणार नाही. मी विधानसभेत पाहतो. 15-20 आमदार शिवसेनेतूनच तिकडे गेलेले आहेत. आम्ही कुपोशीत बालक गुबगुबीत करतो. ते तयार झाले की ते म्हणतात, ये ये सोन्या मांडीवर ये. त्यांना पोर होत नाहीत आणि आमचे झालेले पोर त्यांना पाहवत नाही. आमच्यासाठी एकच नेते राहिले. इतरांसाठी सतराशेसाठ, अशी टीका ही त्यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता केली.

Gulabrao Patil
पाणी देण्याची जबाबदारी मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली..

अंग चोरून काम करणारा कार्यकर्ता नसतो. पक्षातला जुना-नवा वाद दूर ठेवा. पक्षात युवकांना आणा. पदे येतील जातील. मी आमदार नसतानाही अधिकाऱ्याची ताकद नव्हती. कुटूनच टाकायचो. ज्याच्यावर गुन्हा दाखल नाही तो शिवसेनेचा शाखा प्रमुखच होऊ शकत नाही. बॅचलर ऑफ जेल ही आपली पद्वी आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होतं, दोन वेळा हात जोडून सांगा, ऐकत नसेल तर हात सोडून सांगा. तेच करायचय आम्हाला. आगामी निवडणुकांत पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून द्यायचे आहे

Gulabrao Patil
मीही कोरोना सेंटर काढले होते पण कधी प्रसिद्धी केली नाही

आम्हीही संघर्षातून उभे राहिलो. तो काळ खूप वेगळा होता. बोर्ड लावला तरी पोलिस यायचे. गणपती, नवरात्र आले तरी पोलिस यायचे. हा गुलाबराव दोन-तीन महिने जेलमध्ये सहज जायचा. पोलिस तर आमच्या पाचवीला पुजले होते. आजही पोलिस सोडत नाहीत. त्या काळात पकडायचे आता संरक्षण देतात, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com