अजित पवारांना १०० कोटी दिलेल्या त्या दोन कंपन्या कुणाच्या? : सोमय्यांचा आरोप

हे पुरावे खोटं असल्याचे पवार यांनी सिद्ध करून दाखवावं
 Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र परिवाराकडून 184 कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार सक्तवसुली संचनालयाच्या( ईडी) छाप्यात आढळून आले आहेत. शिवाजी व्हेन्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडो प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या कोणाच्या आहेत? या दोन्ही खासगी कंपन्यांनी अजित पवारांना दहा वर्षांपूर्वी 100 कोटी दिले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चोरीचा माल परत केला, तसा उपमुख्यमंत्री अजित पवार परत करणार आहेत का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. (Who owners the two companies that gave 100 crores to Ajit Pawar? : Somaiya's allegation)

सोमय्या हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार आणि पवार कुटुंबीयांवर आरोप केले. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनींचा जरंडेश्वर साखर कारखान्यांपासून विविध कंपन्यांमध्ये भागिदारी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणींशी बेईमानी केली की महाराष्ट्रातील जनतेशी, याचं उत्तर अजित पवारांनी द्यायला हवं.

 Kirit Somaiya
काँग्रेस आमदार जगतापांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा!

दरम्यान, अजित पवार यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे मी उद्या ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाला पाठवणार आहे. हे पुरावे खोटं असल्याचे शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी सिद्ध करून दाखवावं, असे आवाहनही किरीट सोमय्या यांनी केले आहे.

 Kirit Somaiya
दाजींच्या घरवापसीने अशोक चव्हाण खूष; म्हणाले, काॅंग्रेसला बळकटी मिळेल

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कालच ट्विट करत शरद पवार यांनी केलेल्या टीकेला सोलापुरात जाऊन उत्तर देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. जरंडेश्वरसह इतर साखर कारखान्यांवरून गेली काही महिन्यांपासून सोमय्या यांनी अजित पवार यांना टार्गेट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com