Phaltan : म्हसवड काॅरिडॉरला नेमका कोणी विरोध केला : रामराजेंचा गोरेंना सवाल

Ramraje Naik Nimbalkar आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या टीकेला रामराजेंनी प्रतिउत्तर दिले आहे.
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Goresarkarnama

Satara News : केंद्र सरकारने दिल्ली मुंबई कॉरिडॉरप्रमाणे बंगळूर बाम्बे इंडस्ट्रियल कॉरिडॉर योजना काढली आहे. त्या धर्तीवर कोरेगाव तालुक्यातील सोळशीसह सहा गावात तसेच म्हसवड (ता. माण) येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित कराव्यात. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी, अशी मागणी आम्ही विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. असे असताना म्हसवडच्या कॉरिडॉरला नेमका कोणी विरोध केला, असा प्रश्न आमदार रामराजे नाईक निंबाळक़र Ramraje Naik Nimbalkar यांनी आमदार गोरेंना Jaykumar Gore केला आहे.

माण-खटावचा द्वेष करणाऱ्या रामराजेंनी कॉरिडॉर एमआयडीसी इतरत्र नेण्याचे सर्व प्रयत्न केले. जनतेची दिशाभूल केली, अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली होती. या टीकेला रामराजेंनी प्रतिउत्तर दिले आहे. आमदार रामराजेंनी म्हटले की, म्हसवडच्या कॉरिडॉर एमआयडीसीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला असला तरी तो केंद्र सरकारने मंजूर केलेला नाही. असे खुद्द उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली आहे.

कोरेगाव तालुक्यातील सोळशी सह सहा गावे तसेच म्हसवड (ता. माण) येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत विकसित करावी, अशी मागणी आम्ही लक्षवेधीव्दारे केलेली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घ्यावा. तो जे निर्णय देतील तो मान्य असेल, असे ही सूचवले आहे. सोळशी व म्हसवड असे दोन कॉरिडाॅर जिल्ह्याला मिळणार आहेत.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Maan : जयकुमार गोरेंच्या प्रयत्नांना यश; कॉरिडॉर एमआयडीसी म्हसवड परिसरातच

पण राजकिय विचार किंवा हेवेदावे दूर ठेउन कोरेगाव व म्हसवड या दोन्ही कॉरिडॉरसाठी सहमती न दर्शवता वाद होत राहिले तर कदाचित इंडस्ट्रियल कॉरिडॉर सांगली किंवा सोलापूरकडे जाण्याचा धोका आहे. सोळशी तडवळे जागेला विरोध असल्याचे सांगितले जात असले तरी आज कोणतेही भूसंपादन सहजासहजी होत नाही. कोणी ना कोणी विरोध करतात.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Phaltan : सत्तांतराची स्वप्ने बघू नका; इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच : रामराजे

मात्र, पाठींबा देणारे ही असतात. सहा गावांतील ग्रामपंचायतींचे ठराव आमच्याकडे असून ते आम्ही शासनाकडे पाठवत आहोत. पण, म्हसवडच्या कॉरिडॉर एमआयडीसीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला असला तरी तो केंद्र सरकारने मंजूर केलेला नाही, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिलेली आहे. त्यामुळे कॉरिडॉर बाबत नेमका कोणी विरोध केला, असा सवाल रामराजेंनी उपस्थित केला आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Phaltan : रामराजेंचे खासदार निंबाळकरांना आव्हान, हिंमत असेल तर अपक्ष लढा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com