Rajaram Sugar Factory Election Result: सभासदांचा कल कुणाकडे? राजाराम कारखाना निवडणूक निकालात मोठी अपडेट

Kolhapur news| छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीच्या तीन फेऱ्यांचे निकाल काय म्हणतायेत?
Satej Patil | Mahadevrao Mahadik
Satej Patil | Mahadevrao MahadikSarkarnama

Rajaram Sugar Factory Election Result: छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी सुरु असून मतमोजणीची तिसरी फेरी झाली. पहिल्या फेरीपासून सत्ताधारी आघाडी असलेलया महाडिक गटाने तिसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम ठेवली आहे. तिसऱ्या फेरीत महाडिक गट २८२१ मतांनी आघाडीवर आहे. पहिल्या फेरीपासून महाडिक गटाने ९०० ते १०० मतांची आघाडी कायम ठेवली होती. यामुळे यावेळी जनतेने महादेवराव महाडिकांनाच्या बाजूनेच कल दिल्याचे हळूहळू स्षष्ट होत आहे. (Kolhapur Sugar Factory Elelction)

सत्तधारी महाडिक गटाचे 21पैकी 8 उमेदवार आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीअंती महाडिक गटाचे विलास यशवंत जाधव 2934, डॉ.मारुती किडगावकर 3129 आणि सर्जेराव पाटील (बोणे) 3051 मतांनी आघाडीवर आहेत. तर विरोधी पॅनलचे सतेज पाटील गटाचे बळवंत गायकवाड यांना 2158 मतं, विलास पाटील 2068 मतं आणि विठ्ठल माने 2361 मतं मिळाली.  (Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result)

Satej Patil | Mahadevrao Mahadik
Rajaram Sugar Factory Election Result: पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर

दरम्यान, छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी सुरु असून मतमोजणीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीतील दोन गटात (दोन टप्प्यात) मतमोजणी पार पडली. सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली. काही तासांतच महादेवराव महाडिक यांची सत्ता कायम राहतेय की सतेज पाटील विजयाचा गुलाल उधळतात हे स्पष्ट होणार आहे.

पहिल्या फेरीतील दोन गटात झालेल्या मतमोजणीत महाडिक पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत तर आत्तापर्यत हाती आलेल्या कलानुसार महाडिक पॅनेलचे एकूण 5 उमेदवार आघाडीवर आहेत. सत्ताधारी महाडिक गट शिवाजी रामा पाटील 3198 मते, सर्जेराव बाबुराव भंडारे यांना 3173 मते आणि अमल महादेवराव महाडिक 3358 मतांनी आघाडीवर होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com