वारी बंदोबस्तावर असताना पोलिस अधीक्षकांना आली चक्कर...

सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची Sant Dyaneshwar Maharaj पालखी फलटणमध्ये Phaltan मुक्कामी असून जिल्हा प्रशासनासह District Administration पोलिसांनीही वारीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Satara SP
Satara SPsarkarnama

फलटण (सातारा) : फलटण येथे वारीच्या बंदोबस्तावर असताना साताऱ्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते खाली बसले. त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना तातडीने बसण्यासाठी खूर्ची आणून दिली. थोडावेळ बसल्यानंतर त्यांना बरे वाटल्याने ते पुन्हा बंदोबस्तावर रवाना झाले.

सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमध्ये मुक्कामी असून जिल्हा प्रशासनासह पोलिसांनीही वारीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आज फलटण येथील वारीच्या बंदोबस्तात स्वतः पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत फौजफाटाही होता.

Satara SP
महिला वारकऱ्यांसाठी यंदाची वारी ठरणार आरोग्यवारी

बंदोबस्तावर असताना पोलिस अधीक्षकांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते खाली बसले. त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना तातडीने खूर्ची बसण्यास आणून दिली. तसेच त्यांना पिण्यासाठी पाणी आणून देण्यात आले. पाणी पिल्यानंतर त्यांना थोडे बरे वाटले.

Satara SP
फलटण पालिका : आरक्षणाने केली दिग्गजांची गोची, तर महिलांना संधी...

तोपर्यंत ही माहिती सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना समजताच त्याही तातडीने तेथे आल्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना सर तुम्ही विश्रांती घ्या, असे सुचवले. पण आजचा दिवस महत्वाचा असल्याने मी इथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. थोडावेळ बसल्यानंतर त्यांना बरे वाटू लागल्यानंतर ते बंदोबस्तावर रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com