महसूल विभाग दोन तासांत ओबीसींचा कोणता डेटा गोळा करणार?

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी राज्यातील महसूल विभागाने ओबीसी आरक्षणाचा डाटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapse

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या संगमनेरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) काल ( रविवारी ) गेले होते. उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महसूल विभागाने ओबीसी आरक्षणाचा डाटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ( Which OBC data will be collected by Revenue Department in two hours? )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणाठी नेमलेल्या समर्पित आयोगाचे राज्यात प्रत्येक महसूल विभागात सुरू असलेले दौरे म्हणजे केवळ फार्स असून, दोन तासांच्या भेटीमधून आयोग नेमका ओबीसींचा कोणता डेटा गोळा करणार ?, असा प्रश्न आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

ते पुढे म्हणाले की, वास्तविक ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जावून माहिती संकलीत केली पाहिजे. मात्र आयोगाचे सदस्य फक्त एका महसूल विभागात जावून अवघ्या दोन तासांत जर माहिती गोळा करणार असतील तर यातून नेमका कोणता डेटा हाती लागणार अशी शंका त्यांनी उपस्थित केली. यापुर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमलेल्या गायकवाड आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जावून सुनावणी घेत नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले होते याची आठवण त्यांनी करून दिली.

महाविकास आघाडी सरकारने आधीच ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत मोठा कालावधी वाया घालवाला आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर जिल्हानिहाय डेटा संकलीत होण्याची अपेक्षा व्यक्त करून,सरकार ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात गंभीर नाही यांना आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारची भूमिका प्रामाणिक नाही हेच सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर दिसून येत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

Radhakrishna Vikhe Patil
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शिवसेना संपवण्यासासाठी राष्ट्रवादीचा जन्म

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील अबकारी करांमध्ये कपात केली. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील नऊ कोटी लाभार्थींना 200 रुपयांचे अनुदान देवून पंतप्रधानानी दिलासा दिला. असे असताना सुध्दा मुख्यमंत्री केंद्राच्या निर्णयावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला काय दिले हे एकदा तरी सांगावे. सर्वच गोष्टी केंद्राने करायच्या मग तुमचे योगदान काय? कोविड संकटात राज्य सरकारने कोणालाही मदत केली नाही. निर्णय फक्त मुंबई पुरते घेतले. मुंबई सोडून मुख्यमंत्र्यांना जनताच दिसत नाही. केंद्राने आतापर्यत दोनदा पेट्रोल आणि डिझेलवर कर कपात केली. भाजप शासित राज्यांनी सुध्दा तसे निर्णय करून जनतेला दिलासा दिला, तुम्ही एकदा तरी करून दाखवा असे थेट आवाहन आमदार विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर आपली प्रतिक्रिया देताना आमदार विखे यांनी 'जो बुँदसे गई वो हौदसे नही आती' अशी मार्मिक टिपणी करून आधी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांकडून वक्तव्य करून घ्यायची आणि नंतर समाजाला गोंजारत बसायचे ही त्यांची जुनीच नीती आहे. त्यांच्या या भुलभूलैय्याला जनता भुलणार नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com