Phaltan : नीरा नदी कुठे आहे... भाटघर धरण कुठल्या नदीवर आहे, हे खासदारांनी सांगावे...

Ramraje Naik Nimbalkar वाठार निंबाळकर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama

Phaltan News : निरा-देवघर प्रकल्पासाठी ३९०० कोटी रुपयांची तरतूद झाली असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगत आहेत परंतु नीरा-देवघरचा प्रकल्प पुर्ततेसाठी दोन हजार कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. मग उर्वरीत १९०० कोटी रुपयांचा खासदार नवीन कारखाना काढणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करुन या खासदारांनी नीरा नदी कुठे आहे व भाटघर धरण कुठल्या नदीवर आहे हे मला सांगावे, असा टोला माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांना लगावला आहे.

वाठार निंबाळकर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नीरा-देवघरमधून बचत झालेल्या तीन टीएमसी पाण्याचे वाटप फक्त फलटण-खंडाळा, फलटण-कोरेगाव आणि फलटण-माळशिरस या लाभक्षेत्रातच दिलं गेलं पाहिजे.

रामराजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याशी भांडून मी धोम-बलकवडी मिळवलं आहे. निरा-देवघर हे सरळ धरण आहे. धोम-बलकवडी हे वाकडे धरण आहे. ते मी बसवून घेतले आहे. हे जर मी केले नसते तर जिहे-कटापूर झाले नसते. त्यामुळे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये. जर हिम्मत असेल तर तुम्ही काहीतरी नवीन करून दाखवा, असे आवाहन रामराजें यांनी खासदारांना केले.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan News: निरा देवघरचे पाणी व्हाया धोम बलकवडी येणार; रणजितसिंह निंबाळकरांचा करिष्मा

मी अपक्ष आमदार असताना लोकांचा विश्वास संपादन करुन मुख्यमंत्री सुधाकर नाईक असताना शिरवळ येथे नीरा-देवघर धरणाचे भूमिपूजन करून तेथे ११ टीएमसीचे धरण बांधले. नीरा-देवघरचा लहान हत्ती मी मोठा केला. मी कष्ट घेतले. आता खासदार म्हणतात की निरा-देवघर आम्ही केले. हे खासदार खोटारडे असून ते फक्त धमक्या देतात, अशी टीकाही रामराजे यांनी केली.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan : आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग तीन महिन्यात पूर्ण करणार : मंत्री गडकरी

खासदार आपण रेल्वे आणली असे म्हणतात पण एकदा टेस्टींग झाल्यानंतर रेल्वे पुन्हा पळलेली मी बघितली नाही. श्रीराम साखर कारखाना व साखरवाडी साखर कारखान्याला अवसायानातून मी बाहेर काढले. पण खासदारांच्या कारखान्यात कामगारांना पगार नाहीत. उसाला योग्य दर दिला जात नाही, असा आरोपही रामराजे यांनी केला.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
मंत्रीपद वाचविण्यासाठी रामराजेंनी नीरा देवघर प्रकल्प रखडवला... रणजितसिंह निंबाळकर

मी निवडणूकांचे रणशिंग फुंकले आहे

आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांमध्ये 'नीरा-देवघर' मुद्दा कळीचा ठरणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आतापासुनच कामाला लागले पाहिजे. अगामी काळात येउ घातलेल्या त्या निवडणूकांचे रणशिंग मी आजच फुंकले आहे, असे समजा असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara Palika : घरपट्टी आकारणीस स्‍थगिती; शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com