Praniti Shinde : प्रणिती शिंदे मंत्री कधी होणार? नाना पटोलेंनी दिले हे उत्तर...

सध्याचा काळ हा मंत्रिपदासाठी लढण्याचा नसून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा आहे.
Nana Patole-Praniti Shinde
Nana Patole-Praniti ShindeSarkarnama

सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) हे रविवारी (ता. १३ मार्च) सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पक्षाच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना अनेकांनी आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मंत्रीपद मिळावे, अशी आग्रही मागणी केली. त्याबाबत बोलताना नाना पटोले यांनी ‘भगवान के यहाँ देर है। पर अंधेर नहीं ।’ असे सांगून हात वर केले. (When will Praniti Shinde become a minister? Nana Patole given by this Answer )

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेसचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना बहुतांश नेतेमंडळींनी आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी केली. त्यावर पटोले बोलत होते. ते म्हणाले की, सध्याचा काळ हा मंत्रिपदासाठी लढण्याचा नसून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा आहे. विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मी लगेचच मंत्री झालो असतो. पण, आपल्याला राज्यात पक्ष संघटन वाढविण्यासाठी वेळ द्यावा लागणार असल्याने त्याकडे सर्वाधिक लक्ष देत आहे.

Nana Patole-Praniti Shinde
विधीमंडळातून मी एकाही पाेलिसाला निलंबित करणार नाही : गृहमंत्र्यांची घोषणा

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी अनेक नेत्यांनी केली, त्यावेळी पटोले म्हणाले की, ‘भगवान के यहाँ देर है। पर अंधेर नहीं ।’ असे म्हणून शिंदे यांच्या मंत्रीपदाबाबत थेट देवाकडे बोट केले. प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवेळी मी स्वत: सोलापूर शहरात मुक्‍कामी असणार आहे, त्यामुळे निश्‍चितपणे आगामी निवडणुकीनंतर महापालिकेवर काँग्रेसचाच तिरंगा फडकेल, ही पांढऱ्या दगडावरील काळी रेघ आहे.

Nana Patole-Praniti Shinde
...अन्यथा शिवसेनेची अवस्था अकाली दलासारखी होईल : हर्षवर्धन पाटलांचे भाकित!

त्यावेळी मी प्रणिती शिंदेंचेही ऐकणार नाही : पटोले

काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी डिजिटल मेंबरशिप ही मोहीम राबविण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना ही एक संधी आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीपूर्वी डिजिटल मेंबरशिप वाढविण्याची आवश्यकता आहे. जे कार्यकर्ते डिजिटल मेंबरशिप अधिक करतील, त्यांनाच निवडणुकीत उमेदवारी देण्यात येईल. त्यावेळी मी आमदार प्रणिती शिंदे यांचेही ऐकणार नाही, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com