मुख्यमंत्री शिवारात रमतात...अन् स्वत: कोळपणी करतात तेव्हा...

Eknath Shinde : आमचं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे.
CM Eknath Shinde Latest News
CM Eknath Shinde Latest NewsSarkarnama

सातारा : मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यापासून सतत व्यस्त असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता.१ नोव्हेंबर) स्वतः च्या शेतात कोळपणी केली. मुख्यमंत्री शिंदे सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या दरे या आपल्या मूळ गावी दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर होते.

मुख्यमंत्री नसताना वारंवार ते आपल्या गावी येऊन शेतीची पाहणी करायचे. कोयना धरणामुळे या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. तरीही या दुर्गम गावात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेती फुलवली आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा दरे या गावी आले होते. (CM Eknath Shinde Latest News)

CM Eknath Shinde Latest News
बच्चू कडूंच्या माध्यमातून बसणारा पहिला हादरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी थोपवला...

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोणताही बंदोबस्त न घेता दोन दिवस वेळ काढून ते गावात थांबले. शेतीची पाहणी केली आणि कोळपणी देखील केली. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी पिकांची लागवड करत गवती चहा, हळद आणि चंदनाच्या झाडांची पाहणी केली. शेततळ्यातील माशांना खाद्य घातले. स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून गावातील शेती विकासासाठी काय करता येईल, याची देखील त्यांनी चर्चा केली.

CM Eknath Shinde Latest News
पुण्यासाठी राज ठाकरेंची नवी रणनिती; तब्बल साडेतीन हजार ‘राजदूत’ !

दरम्यान, माझा जन्म इकडेच झाला असून आपल्याला शेतीची आवड असून माझे आजोबा, वडील शेतकरी आहेत. आमचं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. मी जेव्हा गावी येतो तेव्हा झाडे लावणं, शेतीची मशागत करणं, असे अनेक कामं करत असतो. मी माझ्या आजोबांबरोबर, वडिलांसोबत शेतीत काम केल आहे, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आता मुलगा श्रीकांतही यामध्ये सहभागी होतो. श्रीकांतने इकडे खूप वेगवेगळ्या पिकांची लागवड केली. त्यामध्ये हळद, अनेक औषधी वनस्पतीची लागवड केली असून काजू, आंबे, मोसंबी, संत्रा, अशी अनेक फळांची देखील लागवड केल्या आहे, असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची आणि त्यांच्या साधेपणाची चर्चा मात्र चांगलीच होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com