चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावर संग्राम जगताप काय भूमिका घेणार?

अहमदनगर महापालिकेत ( Ahmednagar Municipal Corporation ) विरोधी पक्षनेते पदाला कोणी नवीन शिलेदार नेमायला सत्ताधारी तयार नसल्याची स्थिती आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावर संग्राम जगताप काय भूमिका घेणार?
Ahmednagar Municipal CorporationSarkarnama

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होऊन आता चार महिने होत आले आहेत. अहमदनगर महापालिकेवर शिवसेना व राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. या सत्तांतरानंतर महिला बालकल्याण सभापती-उपसभापती, सभागृहनेते ही पदे नव्याने नियुक्त झाली. मात्र विरोधी पक्षनेते पदाला कोणी नवीन शिलेदार नेमायला सत्ताधारी तयार नसल्याची स्थिती आहे. What role will Sangram Jagtap play in Chandrakant Patil's letter?

अहमदनगर शहरात शिवसेना व राष्ट्रवादी हे परंपरागत प्रतिस्पर्धी होते. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व शिवसेने माजी आमदार अनिल राठोड यांच्या समर्थकांत हाडवैर होते. राज्यात राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आघाडीत शिवसेना आल्याने ती महाविकास आघाडी झाली. तरी देखील शिवसेना व राष्ट्रवादीचे अहमदनगर शहरात हाडवैर कायम होते. अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेत दोन गट उघडपणे दिसून आले. यातील एका गटाने शिवसेना व राष्ट्रवादीतील वरिष्ट नेत्यांनी मनधरणी करू अहमदनगर महापालिकेवर शिवसेना व राष्ट्रवादीच सत्ता आणली. तोपर्यंत महापालिकेत अडीच वर्षे राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व बसप यांची सत्ता होती. भाजपकडे महापौर पद होते.

Ahmednagar Municipal Corporation
सत्तेतही राष्ट्रवादी, विरोधातही राष्ट्रवादीच

भाजपकडे अनुसूचित जाती महिला उमेदवारच नसल्याने त्यांना महापौर पदाच्या निवडणुकी पासून दूर रहावे लागले. महापालिकेत आता महाविकास आघाडी सत्तेवर आल्यामुळे विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे. भाजपमध्ये विरोधी पक्षनेता कोणी व्हायचे यावरील वाद नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जेष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी सोडवला. चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांना विरोधी पक्षनेते करावे असे पत्र महापालिकेला पाठविले. मात्र विरोधी पक्षनेता नियुक्तीचे अधिकार महापौरांकडे असतात.

Ahmednagar Municipal Corporation
चंद्रकांत पाटील व शिवाजी कर्डिलेंच्या भेटीतून मिळाला महापालिकेला विरोधी पक्षनेता

भाजपचे जरी विरोधी पक्षनेत्याचे नाव ठरले असले तरी सत्ताधाऱ्यांचे अजून काही तसे ठरलेले नाही. महापौर जोपर्यंत विरोधी पक्षनेता जाहीर करत नाही तोपर्यंत जुनाच विरोधी पक्षनेता पदावर कायम आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संपत बारस्कर विराजमान आहेत. त्यामुळे सत्तेतही राष्ट्रवादी आणि विरोधातही राष्ट्रवादी असा राष्ट्रवादीचा दुहेरी खेळ सुरू आहे. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे असल्याने सत्ताधाऱ्यांना विरोध होताना दिसत नाही.

जरी भाजपचा विरोधी पक्षनेता नियुक्त करण्याची वेळ आली तरी तो आमदार संग्राम जगताप यांच्या मर्जीतील असण्याची शक्यता असल्याचेही महापालिकेत बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.