संजय मंडलिक व हसन मुश्रीफांच्या भेटीत काय झाले?

शिवसेनेचे बंडखोर खासदार संजय मंडलिकांनी हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांची भेट घेतली. या भेटीत काय झाले हे मुश्रीफांनी एका मुलाखतीत सांगितले.
 Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोनही खासदार शिंदे गटात गेले आहेत. यात संजय मंडलिकांचाही समावेश आहे. त्यामुळे संजय मंडलिकांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार यावर उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) हेही संजय मंडलिक विरोधातील उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे. अशातच संजय मंडलिकांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. या भेटीत काय झाले हे मुश्रीफांनी एका मुलाखतीत सांगितले. ( What happened in the meeting between Sanjay Mandlik and Hasan Mushrif? )

हसन मुश्रीफ म्हणाले, माझी लोकसभा लढण्याची इच्छा नाही. विधानसभाच लढण्याची माझी इच्छा आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख नेते जे सांगतील त्या प्रमाणे आदेश पाळावा लागेल. मात्र या निवडणुकीला अजून दोन ते अडीच वर्षे आहेत. पाणी खुप उतरणार आहे. चढणार आहे. अनेक स्थित्यंतरे, अनेक घटना घडणार आहेत. त्यानंतर आपण चर्चा करू. ही ती योग्य वेळ नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

 Hasan Mushrif
राजकारणात नवा ट्विस्ट! खासदार संजय मंडलिक एकीकडं अन् मुलगा वीरेंद्र दुसरीकडं

ते पुढे म्हणाले की, आपली तयारी कायमच सुरू असते. मी असा कार्यकर्ता आहे की सकाळी साडेपाच पासून कोल्हापुरात लोकांच्या सेवेत असतो. जिल्ह्यातील सर्व लोक भेटत असतात. सर्वांना माहिती आहे की, हसन मुश्रीफ हा सर्वांची कामे करणारा एक कार्यकर्ता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंडलिक यांनी दिल्लीत जाण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांनी सांगितले की, मंडलिकांनी मला सांगितले की, अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. ते गेले आहे. मतदारसंघात निधी मिळविण्यासाठी शिंदे गटात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी मला व सतेज पाटील यांना भेटून यावर सविस्तर चर्चा केली. ते निर्णय घेऊन आले असल्याने त्यांना समजावण्याचा काही प्रश्न नव्हता. ते निर्णय सांगण्यासाठी आले होते, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

 Hasan Mushrif
हसन मुश्रीफ यांनी नाक दाबल्याने धुळ्याचे भाजप नेते कासावीस!

त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे. समाजात काय मते होतात. याचा त्यांनी अभ्यास केला असेल. मी त्यांना सांगितले की, तुम्ही मोर्चा काढला. बेन्टेक्स म्हंटलं. याचे तुमच्यावर बुमरॅन्ग होऊ शकते, असे मी त्यांना म्हणालो. शेवटी त्यांनी निर्णय घेतला होता, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com