Eknath Shinde : जेसीबीने पुष्पवृष्टी करत एकनाथ शिंदेंचे सातारा जिल्ह्यात स्वागत...

मुख्यमंत्री CM एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे दोन दिवसांसाठी Two day visit सातारा जिल्ह्यात satara District आगमन झाले.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

शिरवळ : राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपूत्र एकनाथ शिंदे यांचे आज सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आगमन झाले. यावेळी जिल्ह्याच्या सीमेवर निरा नदीकाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराजे देसाई यांचे शिंदेवाडी (शिरवळ ) ता. खंडाळा येथे जेसीबीच्या साहय्याने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तसेच जिल्हा पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन दिवसांसाठी जिल्ह्यात आगमन झाले. ते महाबळेश्वर मार्गे यांच्या दरे तांब या गावी जाणार आहेत. त्यापूर्वी ते महाबळेश्वर व तापोळा येथे नागरीकांच्यावतीने सत्कार स्वीकारणार आहेत. त्यानंतर मुळगावी जाऊन ग्रामदेवतांचे दर्शन घेणार असून सायंकाळी तेथील ग्रामस्थांशी हितगुज करणार आहेत.

Eknath Shinde
नितीशकुमारांनी आपल्या पक्षातील 'एकनाथ शिंदे' ओळखला आणि भाजपलाच डच्चू दिला...

शुक्रवारी ते सकाळी सात वाजता तापोळा व परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा करून असून दुपारी दोन वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत. आज त्यांचे शिरवळ, खंडाळा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर विभागाचे पोलिस महासंचालक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, नितीन भरगुडे पाटील, पुरुषोत्तम जाधव, शिरवळच्या सरपंच लक्ष्मीबाई पानसरे, भाजपाचे अनुप सुर्यवंशी, प्रदीप माने, सारिका माने, भुषण शिंदे, कार्यकर्ते उपस्थित होते.

Eknath Shinde
Satara : उदयनराजे फडणवीसांना भेटताच... शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा...

यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांना जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच अनेक कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याचप्रमाणे खंडाळा येथेही कार्यकर्त्यांच्या वतीने यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिरवळ व खंडाळा येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com