
कऱ्हाड : भारत जोडो यात्रेदरम्यान अर्धापूर नांदेड येथे कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घालुन दिली. त्यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी फुले पगडी देवुन राहुल गांधींचा सन्मान केला. त्यानंतर गांधी यांनी सिर पर ये सिर्फ 'फेंटा' नहीं है...सम्मान है महाराष्ट्र का, और इस सम्मान को मैं सदा सिर-आंखों पर रखूंगा...कभी झुकने नहीं दूंगा... असे व्टीट करुन त्या सत्काराला दाद दिली.
कॉंग्रेस नेते राहूल गांधी भारत जोडो पदयात्रेनिमित्त विविध समाज घटकांशी संवाद साधत आहेत. त्याअंतर्गत त्यांना नांदेडमध्ये कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, ओबीसी विभागाचे विजय राऊत (नाशिक), राहुल पिंगळे (ठाणे) ,जी पी पाटील (नांदेड), राजेंद्र राख, मयूर वांद्रे, विजय देवडे, गौरव वाघ, मिलिंद चित्ते, महेश गायकवाड, कुलदीप वानखेडे, मयूर मोटकरी आदींशी संवाद साधला.
त्यावेळी सेलचे प्रदेशाध्यक्ष माळी यांनी फुले पगडी देवुन राहुल गांधींचा सन्मान केला. त्यादरम्यान फुले - शाहू- आंबेडकर यांचे विचारच देशाला वाचवू शकतात असे उद्गार गांधी यांनी काढले. माळी यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना व कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन या दोन प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावर गांधी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मेनीफेस्टोमध्ये या दोन प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात येईल असे आश्वासन दिले.
लोकसभा निवडणूकी पूर्वी पुणे येथे ओबीसींच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून सदर मेळाव्यास राहुल गांधी यांनी करण्यात आली. ती त्यांनी मान्य केली. त्यानंतर गांधी यांनी सिर पर ये सिर्फ 'फेंटा' नहीं है...सम्मान है महाराष्ट्र का और इस सम्मान को मैं सदा सिर-आंखों पर रखूंगा...कभी झुकने नहीं दूंगा। असे व्टीट करुन त्या सत्काराला दाद दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.