पवारसाहेबांबद्दल नितांत आदर; भाजपप्रवेशाचे तुम्हाला कळेलच : फडणवीस भेटीवर राजन पाटील म्हणाले...

माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज (ता. २५ जुलै) नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Rajan patil
Rajan patilsarkarnama

सोलापूर : आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) आणि मी दोघेही साखर कारखानदार आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आमच्या काही अडचणी घेऊन गेलो होतो. तसेच, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांचे अभिनंदनही करायचे होते, त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली. आमचा भाजप प्रवेश झाला तर ते तुम्हाला कळेलच, असे सूचक वक्तव्य मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना केले. (We have utmost respect for Sharad Pawar: Rajan Patil)

माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज (ता. २५ जुलै) नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना राजन पाटील यांनी हे सूचक वक्तव्य केले.

Rajan patil
राष्ट्रवादीला मोठा धक्का : बबनदादा शिंदे, राजन पाटलांनी घेतली दिल्लीत फडणवीसांची भेट

राजन पाटील या भेटीबाबत म्हणाले की, मी आणि बबनदादा आमच्या कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. त्या वेळी आम्ही महाराष्ट्र सदनात उतरलो होतो. त्याच वेळी उपमुख्यमंत्री फडणवीससुद्धा महाराष्ट्र सदनात होते. बबनदादा आणि मी दोघे ही कारखानदार आहोत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आमच्या काही अडचणी सांगण्यासाठी तसेच, उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली म्हणून अभिनंदन करण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटलो, असे स्पष्टीकरण मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिले आहे.

Rajan patil
पुणे दौऱ्यात एकनाथ शिंदे शिवसेनेला आणखी धक्के देणार का?

माझी आणि बबनदादांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्याचबरोबर जर आमचा भाजपमध्ये प्रवेश झालाच, तर ते झाकून राहणार नाही. ते तुम्हाला कळणारच आहे, असं म्हणत माजी आमदार राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाचे एका अर्थाने संकेत दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात उघडपणे टीकास्त्र सोडत आहेत. जनता दरबारच्या माध्यमातून ते पाटील कुटुंबीयांवर निशाणा साधत आहेत. वरिष्ठ नेत्यांना सांगूनही उमेश पटलांना पक्षाकडून कुठलीही समाज दिली जात नाही, अशी खदखद राजन पाटलांच्या मनात गेल्या काही दिवसांपासून आहे. ते वेळोवेळी दिसून आली आहे.

Rajan patil
मोठी बातमी : इंदापूर तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले; पायलट युवती जखमी

राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे दिसून येत असून त्यातून त्यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळं राजन पाटील आणि बबनदादा शिंदे भाजपच्या गळाला लागले, तर सोलापूर जिल्ह्यातील दोन मोठे साखर कारखानदार भाजपच्या बाजूने सामील होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in