
Satara News : ते वयाने मोठे असून विचाराने मोठे असून त्यांचे वाचनही मोठे आहे. त्यामुळे सातारा लोकसभेच्या मागील निवडणुकीतील निकालाबाबत ते म्हणाले ते योग्य आहे. पण, मी आणि आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही. निवडणुकीत कोण काय करते, काय नाही, हा भाग वेगळा आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.
खासदार उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale यांनी जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंना भाजपकडून मोठे जबाबदारी दिली जाणार आहे, त्यांचा सातारा लोकसभेच्या निवडणुकीत होईल का, असे विचारले होते. त्यावर शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांच्या निवडणुकीत कोणाला फटका बसला हे समजले असेल.
त्यामुळे भाजपने उदयनराजेंवर मोठी जबाबदारी दिली, तरी राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आज शरद पवारांच्या त्या राजीनामा नाट्याबाबत खासदार उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले, मी राजीनामा दिला पण मागे घेतला नाही. त्यांनी दिला आणि मागे घेतला, का ते त्यांना विचारा. शेवटी वयाने ही ते मोठे आहेत.
विचारांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांचे वाचन मोठे आहे. ते म्हणाले ते योग्य आहे. पण, मी व आमच्या घराण्याला विश्वासघात करण्याची आमची परंपरा नाही. त्यामुळे शेवटी एखाद्या निवडणुकीत कोण काय करतं, काय करत नाही, हा भाग वेगळा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.