आम्ही राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देतो

राज्यमंत्री संजय बनसोडे ( Sanjay Bansode ) हे राहुरी तालुक्यातील एका कार्यक्रमानिमित्त आले होते.
state minister sanjay bansode
state minister sanjay bansode Sarkarnama

अहमदनगर - राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे हे राहुरी तालुक्यातील एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांनी आज शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या समाधीचे व शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले. शिर्डीतील उपस्थित पत्रकारांशी बोलताना मंत्री संजय बनसोडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ( We give priority to solving the problems of the people of the state )

मंत्री संजय बनसोडे म्हणाले, साईबाबांचे आज दर्शन घेतल्यावर आनंद वाटला. साईबाबांना मी साकडे घातले की, राज्यातील खालच्या पातळीवर होत असलेले राजकारण व जाती-जातीमध्ये विष पेरण्याचे काम काही मंडळी करत आहेत. साईबाबा हे कुठे तरी थांबले पाहिजे. आम्ही गुण्या गोविंदाने सर्व जातीधर्माचे लोक राज्यात राहतो. त्यांच्यावर सदैव बाबांचे आशीर्वाद राहोत, ही प्रार्थना केली.

state minister sanjay bansode
दीपक केसरकर म्हणाले, खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही...

ते पुढे म्हणाले की, आमचे नेते शरद पवार यांनी आम्हाला एक गोष्ट शिकविली आहे की, निवडणुकीपुर्ते राजकारण करायचे आणि इतर वेळी समाजकारण करायचे. आमचा पक्ष आमच्या नेत्याच्या विचारधारेवर चालतो. भोंगे, मास्टर सभा, बुस्टर सभांकडे लक्ष्य न देता जनतेला न्याय कसा देता येईल. आम्ही राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देतो.

पाण्याच्या टॅंकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. कुठे पाणी टंचाई असेल तर स्त्रोत अधिग्रहन करून पाणी उपलब्ध करून दिले जाईल. 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला पाणी देणार आहोत. यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

state minister sanjay bansode
कांद्याला एक रुपया भाव मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

जलजीवन मिशनमध्ये केंद्राचा 50टक्के व राज्याचा 50 टक्के वाटा आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ही योजना आहे. पाणी पुरवठा विभागाचा मंत्री म्हणून मी या योजनेची माहिती घेतली आहे. मात्र तेथे अनियमितता आढळून येत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाणीपुरवठा विभाग मंत्री यांच्या सूचनेने आम्हाला या योजनेत स्वच्छ काम करायचे आहे. पाण्याचे स्त्रोत व धरणातील जलसाठे राखीव करून जनतेला पाणी द्यायचे आहे. सर्व तांत्रिक गोष्टींचा विचार करून योजना आखणार आहोत. दोन-तीन महिन्यात सर्वेक्षण करून निविदा प्रक्रिया राबविणार आहोत. 2024पर्यंत या योजना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पैशाबाबत कमतरता जाणवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

state minister sanjay bansode
केतकी चितळेवर पारनेरमध्ये गुन्हा दाखल : 'शिवप्रहार'चे संजीव भोर आक्रमक

महावितरणने वाचविले

मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, महावितरण कंपनीने अत्यंत परिस्थिती हाताळून राज्याला भारनियमना पासून वाचविले. देशात कोळसा टंचाईमुळे इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकारने भारनियमन परिस्थितीला काळजीपूर्वक हाताळून राज्याला भारनियमनापासून दूर ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या दिवसा वीज मागणी बाबत तोडगा काढण्यासाठी सौरकृषी वाहिनीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

मंत्री बनसोडे यांच्या समवेत ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत, संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com