'आम्ही 'बापूं'च्या संस्कारावर राजकारण करतो'

राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले.
'आम्ही 'बापूं'च्या संस्कारावर राजकारण करतो'
Rajendra NagawadeSarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते तथा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade )भाजपचे ( BJP ) आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या समर्थकांत लढत आहे. त्यामुळे या दोन नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले. 'We do politics on Bapu's rites'

राजेंद्र नागवडे म्हणाले, आयुष्यभर शिवाजीराव बापू नागवडे यांचे राजकारण संपविण्यासाठी सर्व प्रयत्न केलेलेच आता 'बापूं'चा फोटो लावून नागवडे कुटुंबाच्या विरोधात पुन्हा उभे आहेत. 'बापूं'नी ज्यांच्यावर जिवापाड प्रेम केले, तेही विरोधात आहेत. आम्ही 'बापूं'च्या संस्कारावर राजकारण करतो. नागवडे कुटुंबाच्या विरोधात सगळे एकवटले आहेत. आम्हाला एकटे पाडून 'बापूं'चे नावच पुसण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याचा गंभीर आरोप राजेंद्र नागवडे यांनी केला.

Rajendra Nagawade
बबनराव पाचपुते म्हणाले, राजेंद्र नागवडे यांना पैशाची गुर्मी...

नागवडे पुढे म्हणाले, की शिवाजीराव नागवडे यांच्या आशीर्वादाने कारखान्याचा कारभार उत्तम सुरू आहे. दर वर्षी गाळप चांगले होत असून, यंदाच्या हंगामात तर प्रतिदिन रेकॉर्डब्रेक गाळप झाले. चांगल्या कारभारामुळेच कारखान्याला ऑडिट वर्ग 'अ' आहे. आसवानी प्रकल्प, सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू आहेत. सभासदांना जिल्ह्याच्या बरोबरीचा भाव देऊन वेळेवर पेमेंट केले. कुणाचेही पैसे थकलेले नाहीत. एवढे सगळे करूनही आमच्यावर केवळ राजकीय द्वेषापोटी आरोप होत असल्याची खंत आहे.

दोनच संचालकांना हा कारभार चुकीचा वाटतो, असे सांगत नागवडे म्हणाले, की आम्ही दहा हजार सभासदांना कमी केल्याचा व त्यांना मतदानाचा हक्क त्यांनी मिळवून दिल्याचा कांगावा सुरू आहे. त्यासाठी विरोधकांनी एखादा पुरावा तरी दाखवावा. दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वत: सज्जन होता येत नाही. तसे कृतीतून दाखवावे लागते.

Rajendra Nagawade
नागवडे पाचपुतेंना म्हणाले, 'तुम्ही' आमच्यामुळेच आमदार...

आमदार बबनराव पाचपुते यांनी आयुष्यभर बापू व नागवडे कुटुंबाविषयी द्वेष केलेलेच आता बापूंचा फोटो लावून, कारखाना ताब्यात द्या असे सांगत आहेत. बापूंना राजकारणातून संपविण्यासाठी सगळे प्रयत्न केले. खोटेनाटे आरोपही केले, मात्र सभासदांनी नेहमीच कारखान्याबद्दल नागवडे कुटुंबावर विश्वास दाखविला.

बापूंच्या जिवावर जे मोठे झाले, तेही विरोधात आघाडीवर असल्याचे दु:ख आहे. आम्ही बापूंच्याच संस्कारात वाढलो असून, सभासद आमच्यासोबत असल्याने विरोधकांचा एकही उमेदवार जिंकणार नाही. तशी दक्षता मतदार घेतील, असा विश्वासही नागवडे यांनी व्यक्त केला.

Rajendra Nagawade
नागवडे साखर कारखाना निवडणूक : समर्थकांचा बबनराव पाचपुते यांना सर्वाधिकार

पाचपुतेंनी त्यांचा इतिहास तपासावा : नागवडे

नागवडे म्हणाले, की बापूंचे राजकारण संपविण्यासाठी प्रयत्न करणारे माजी मंत्री बबनराव पाचपुते हे हभप आहेत. त्यांनी सत्तेच्या काळात केलेल्या प्रतापांचा कारखान्याच्या सत्तेचा बायस अहवाल तयार झाला आहे. तेरा वर्षे मंत्रिपद असताना केलेल्या गैरव्यवहारांचा ग्रंथच तयार होइल. दुसऱ्यांकडे बोट करण्यापूर्वी त्यांनी त्यांचा इतिहास तपासावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in