'बंडखोरांप्रमाणेच आमच्याही व्यथा; तरीही आम्ही उद्धव ठाकरेंसोबत!'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात चांगले काम केले आहे.
Nagnath Kshirsagar
Nagnath KshirsagarSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : गेले एक तप मी शिवसेनेचे (Shivsena) काम करतो आहे. मुख्यमंत्री आमचा असतानाही मोहोळ विधानसभा मतदार संघात साधा एक किलोमीटरचा रस्ता ही आम्ही करू शकलो नाही. बंडखोर आमदारांच्या ज्या व्यथा आहेत, त्याच आमच्याही आहेत. तरीही आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबतच आहोत व सोबतच राहू, अशी ग्वाही मोहोळ येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर यांनी केले. (We are with Uddhav Thackeray: Nagnath Kshirsagar)

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बहुसंख्य आमदारांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड केले आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर पत्रकारांशी बोलत होते. आम्ही शिवसेनेत सक्रिय असून पक्ष, गट-तट न पाहता आम्ही मतदारांच्या कामाला प्राधान्य देत आहोत. मतदार हेच आमचे सर्वस्व असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

Nagnath Kshirsagar
मोठी बातमी : मनधरणीसाठी सूरतला गेलेले रवींद्र फाटकच एकनाथ शिंदे गोटात सामील

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक सर्वसामान्यांची कामे असतात. त्या सर्वांची निवेदने किंवा माहिती घेऊन आठवड्याला शिवसेनेचे युवा नेते, आमचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांना मुंबई येथे मंत्रालयात पाठवितो. तेथील संबंधीत खात्याचे मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क करून सर्वसामान्यांची कामे मार्गी लावली जातात. हा सध्या आमचा एकमेव कार्यक्रम आहे.

Nagnath Kshirsagar
एकनाथ शिंदे परत या...सोलापूरच्या महिला नेत्या ढसाढसा रडल्या!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात चांगले काम केले आहे. कोविडचा कालावधी, अतिवृष्टी यासह शेतकऱ्यांवर आलेल्या विविध संकटात त्यांनी मदत करण्याचे मोठे काम मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. मात्र, सध्या ज्या आमदारांनी बंडाची भूमिका घेतली आहे, त्यात बरेच तथ्य असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com