Maan News : माण, खटावच्या दुष्काळप्रश्नी शासनाला जागे करणार; सर्वपक्षिय मोर्चाचा इशारा

All Party Meeting दुष्काळी प्रश्नासंदर्भात वडुजला सर्वपक्षिय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.
Prabhakar Deshmukh
Prabhakar Deshmukhsarkarnama

-अय्याज मुल्ला

Maan NCP News : सप्टेंबर महिना संपत आला तरी खटाव-माण तालुक्यात अद्याप पाऊस नाही. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तर गावोगावी पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळाची दाहकता सरकारला दाखवून देण्यासाठी आगामी काळात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिला.

वडुज येथील सिध्दीराज मंगल कार्यालयात दुष्काळी प्रश्नासंदर्भात आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रभाकर देशमुख Prabhakar Deshmukh बोलत होते. श्री. देशमुख म्हणाले, खटाव-माण तालुक्यात Maan-Khatav उरमोडी, जिहे-कटापूरचे पाणी काही गावांना मिळत आहे. मात्र, या पाणी वाटपामध्ये मोठा सावळा गोंधळ आहे.

वास्तविक पाहता पाणी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांना आहेत. मात्र लोकप्रतिनिधी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करुन प्रशासनाला वेठीस धरत आहेत. या गोष्टीचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. तसेच चारा टंचाईवर मात करण्यासाठी सरकारसह स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज आहे.

दुष्काळी प्रश्नासंदर्भात शासनाला जाग आणण्यासाठी गणेशोत्सवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सह शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना, आर.पी.आय., राष्ट्रीय समाज पक्ष व जे कोणी बरोबर येतील त्या सर्वांना घेवून तहसिलदार कार्यालय, प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बैठकीस पुणे विभागीय पतसंस्थेचे अध्यक्ष, वडूजचे माजी सरपंच अनिल गोडसे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेवक सुनिल गोडसे, संजय गोडसे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पवार, शशिकांत मोरे, भालचंद्र कदम, प्रतापराव देशमुख, सुर्यभान जाधव, विनायक खाडे, दादासाहेब कचरे, अक्षय थोरवे, रविंद्र खाडे, शशिकांत देशमुख, संभाजी पवार, चैतन्य गोडसे, विजय मांडवे, शशिकांत फडतरे, चंद्रकांत शिंदे, प्रसाद कुंभार आदिंसह गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

Prabhakar Deshmukh
Satara Political News : शंभूराज देसाई म्हणाले, आमचे आमदार दोषी नाहीत; बाजू मांडण्यास पुरेशी संधी द्यावी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in