कोपरगाव नगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर : इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू

कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 प्रभागांतील आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
Kopargaon Nagarparishad
Kopargaon NagarparishadSarkarnama

कोपरगाव ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यातील 10 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( नगरपालिका, नगरपंचायत) प्रभाग रचनेचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. यात कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 प्रभागांतील आरक्षणाची सोडत आज (सोमवारी) उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रभागातील इच्छुक उमेदवार आता पक्षांच्या कार्यालयांत दिसू लागले आहेत. ( Ward reservation of Kopargaon municipality announced: Preparations of aspiring candidates have started )

नगरपालिकेच्या 15 प्रभागांतून 30 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहे. त्यातील 15 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नगरपालिका कार्यालयाच्या आवारात आज सकाळी अकरा वाजता ही सोडत काढण्यात आली. आयेशा शेख या विद्यार्थिनीच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

Kopargaon Nagarparishad
आशुतोष काळेंनी वचन केले पूर्ण : कोपरगाव पाणी योजनेसाठी 123 कोटी मंजूर

प्रभाग 8 अ, 9 अ, 11 अ, 2 अ व 15 अ हे अनुसूचित जाती करिता आरक्षित झाले आहेत. त्यातील प्रभाग 2 अ, 8 अ व 11 अ साठी महिला आरक्षण पडले आहे. 9 अ व 15 अ ही जागा अनुसूचित जातीकरिता खुली झाली आहे. पाच अ ही जागा पुरुषासाठी असणार आहे. एकंदरीत नगरपालिका निवडणुकीसाठी सोडत निघाल्याने अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आरक्षणामुळे काहींचे स्वप्न भंगले आहे

Kopargaon Nagarparishad
'ईडी'चे बंद गेट पाहून नितीन राऊतांच्या अंगात 'ऊर्जे'चा संचार

आरक्षण पुढीलप्रमाणे

प्रभाग 1 अ - सर्वसाधारण महिला, 1 ब सर्वसाधारण. प्रभाग 2 अ- अनुसूचित जाती महिला, 2 ब - सर्वसाधारण प्रभाग 3 अ- सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण प्रभाग 4 अ- सर्वसाधारण महिला, 4 ब - सर्वसाधारण प्रभाग 5 अ- अनुसूचित जमाती, 5 ब - सर्वसाधारण महिला प्रभाग 6 अ- सर्वसाधारण महिला, 6 ब- सर्वसाधारण प्रभाग 7 अ- सर्वसाधारण महिला, 7 ब- सर्वसाधारण. प्रभाग 8 अ- अनुसूचित जाती महिला, 8 ब- सर्वसाधारण प्रभाग 9 अ- अनुसूचित जाती, 9 ब- सर्वसाधारण महिला प्रभाग 10 अ- सर्वसाधारण महिला, 10 ब- सर्वसाधारण प्रभाग 11 अ- अनुसूचीत जाती महिला, 11 ब- सर्वसाधारण प्रभाग 12 अ- सर्वसाधारण महिला, 12 ब- सर्वसाधारण प्रभाग 13 अ- सर्वसाधारण महिला, 13 ब- सर्वसाधारण प्रभाग 14 अ- सर्वसाधारण महिला, 14 ब- सर्वसाधारण प्रभाग 15 अ- अनुसूचित जाती, 15 ब- सर्वसाधारण महिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com