Wai : कोकणातील या रस्त्यासाठी मकरंद पाटलांचे नितीन गडकरींना साकडे

Makrand Patil मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार असून त्यांच्या वाई, खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातूनच पुढे कोकणात जाण्यासाठी रस्ता आहे.
Makrand Patil, Nitin Gadkari
Makrand Patil, Nitin Gadkarisarkarnama

Satara News : सुरुर - पोलादपूर या मार्गास राष्ट्रीय महामार्ग दर्जा मिळाला असून त्याचा विकास आराखडा तयार आहे. मात्र, या राष्ट्रीय महामार्गास क्रमांक मिळणे बाकी असून तो तातडीने मिळून विकास आराखड्यास मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी लक्ष घालावे, अशी मागणी वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मंत्री गडकरी यांना पत्र पाठवले आहे.

याबाबतची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी व्टीटव्दारे दिली आहे. मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार असून त्यांच्या वाई, खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातूनच पुढे कोकणात जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याचा विकास होऊन त्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

आमदार मकरंद पाटील यांनी म्हटले की, कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी व सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना महाबळेश्वरमार्गे कोकणात जाण्या - येण्यासाठी सुलभ व महत्त्वाचा असलेला सुरूर ते पोलादपूर हा मार्ग मुंबई-गोवा आणि पुणे-बेंगलोर महामार्गाला पुढे जोडला असतो. या राज्यमार्गावर प्रचंड वाहतुक असते.

Makrand Patil, Nitin Gadkari
Satara : अजितदादांनी वैचारीक मोठेपणा दाखवावा...शहाजीबापू

सुरुर - पोलादपूर या मार्गास राष्ट्रीय महामार्ग दर्जा मिळाला असून त्याचा विकास आराखडा तयार झाला आहे. मात्र, या राष्ट्रीय महामार्गास क्रमांक मिळणे बाकी आहे. तो तातडीने मिळून विकास आराखड्यास मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालावे., अशी विनंती त्यांनी पत्र पाठवून केली आहे.

Makrand Patil, Nitin Gadkari
Satara : साखर कारखानदारीला उभारी द्या : शिवेंद्रराजेंनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्र्यांची भेट

तसेच सुरूर - वाई - पोलादपूर या राष्ट्रीय महामार्गास क्रमांक मिळण्यासह व विकास आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडे विशेष पाठपुरावा होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावेत, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Makrand Patil, Nitin Gadkari
Pune MPSC Students Protest : पुण्यातील एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित, पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in