वाई पालिका आरक्षण : मातब्‍बरांचे मनसुबे धुळीला
Wai Muncipaltysarkarnama

वाई पालिका आरक्षण : मातब्‍बरांचे मनसुबे धुळीला

वाई पालिकेत Wai Muncipalty सध्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे Tirthakshetra Vikas Aghadi १४ व वाई महाविकास आघाडीचे Wai Mahavikas Aghadi सहा असे पक्षीय बलाबल आहे.

वाई : वाई शहरातील प्रभाग आरक्षणामुळे पालिकेच्या वर्तुळात ‘कही खुशी तर कही गम’अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांना पालिकेची निवडणूक लढविण्याची संधी प्राप्त होणार आहे. मात्र, बदलती प्रभागरचना, वाढती लोकसंख्या व महिला आरक्षण यामुळे सर्वच इच्छुकांचा कस लागणार आहे. तर अनुसूचित जाती-जमातीच्या राखीव व महिला सदस्याच्या आरक्षणामुळे काही मातब्‍बर व दिग्गज इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

वाई पालिकेत सध्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे १४ व वाई महाविकास आघाडीचे सहा असे पक्षीय बलाबल आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर सुरवातीला भाजपच्या डॉ. प्रतिभा शिंदे विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या निलंबनानंतर नगरविकास विभागाने या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याकडे सोपविला. शासनाच्या नवीन आदेशानुसार प्रभाग व सदस्य संख्या वाढली आहे. त्यामुळे जुनी प्रभागरचना बदलली असल्याने सर्वच इच्छुकांचा कस लागणार आहे.

Wai Muncipalty
सातारा पालिका : महिला उमेदवार निवडताना दोन्ही आघाड्यांचा कस लागणार...

विरोधी नेते सतीश वैराट यांचा प्रभाग बदलला असून सदर जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाली आहे. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक संग्राम पवार यांचाही प्रभाग बदलला असून याठिकाणी अनुसूचित जाती सर्वसाधारण आणि महिला असे आरक्षण झाले आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर निवडून आलेले नगरसेवक कांताराम जाधव यांची जागा महिलांसाठी राखीव झाली आहे.

Wai Muncipalty
फलटण पालिका : आरक्षणाने केली दिग्गजांची गोची, तर महिलांना संधी...

नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा प्रभाग मोठा झाला असून तीन सदस्यांचा समावेश असलेल्या या प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या इच्छुकांची संख्या विचारात घेता अनिल सावंत यांच्यापुढेही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अन्य प्रभागांत नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी प्राप्त होणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबत शासन काय निर्णय घेणार, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in