दणदणीत विजयानंतर 'विठ्ठल'च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला मिळाला मोठा मान

कारखान्याच्या निवडणुकीत भालके-काळे गटाचा दारूण पराभव झाला आहे.
Vithal Sugar Factory News, Abhijeet Patil Latest News, Premlata Ronge News
Vithal Sugar Factory News, Abhijeet Patil Latest News, Premlata Ronge NewsSarkarnama

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर कारखान्याच्या 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. प्रेमलता रोंगे यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. (Vitthal Sugar Factory News)

पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीमध्ये डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) गटाने मोठा विजय मिळवला आहे.

Vithal Sugar Factory News, Abhijeet Patil Latest News, Premlata Ronge News
Ajit Pawar : अजितदादांचा 'तो' हट्ट पुरवून फडणवीस 2019 ची परतफेड करणार?

कारखान्याच्या एकूण सहा ऊस उत्पादक गटातून सरासरी १३०० ते १४०० मतांची आघाडी घेत पाटील गटाने २० जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. भालके-काळे गटाला संस्था मतदार संघातील केवळ एक जागा मिळाली. या पराभवामुळे भालके यांना मोठा धक्का बसला आहे.

त्यानंतर आता अभिजित पाटील यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कारखान्याच्या नूतन संचालकांची गुरूवारी कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यामध्ये पाटील आणि रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या 45 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला.

Vithal Sugar Factory News, Abhijeet Patil Latest News, Premlata Ronge News
Shiv Sena : शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार; आता थेट बिर्लांना देणार आव्हान

विठ्ठल कारखाना मागील दोन वर्षांपासून बंद होता. आता एक ऑक्टोबरपासून हा कारखाना सुरू केला जाणार आहे. किमान बारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याकडून ठेवण्यात आले आहे. गाळप हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस वाहतूक ठेकेदारांची थकीत देणी देणार असल्याचेही पाटील यांनी निवडीनंतर जाहीर केलं. तर महिला सभासदांसाठी विशेष योजना राबवणार असल्याचे प्रेमलता रोंगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in